Himanshu Malhotra : पत्नी अमृता खानविलकरसोबत कधी काम करणार? हिमांशू मल्होत्राचं भन्नाट उत्तर

हिमांशू मल्होत्रा (Actor Himanshu Malhotra) आणि अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar)एकत्र काम करतील का, असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना नेहमीच पडलेला असतो. आता यावर खुद्द हिमांशूनंच खुलासा केलाय. नच बलिये 7(Nach Baliye 7)मध्ये हिमांशू आणि अमृता यांनी भाग घेतला होता. 'चिकू की मम्मी दूर की' (Chiku Ki Mummy Dur Ki) या मालिकेत सध्या तो काम करतो.

Himanshu Malhotra : पत्नी अमृता खानविलकरसोबत कधी काम करणार? हिमांशू मल्होत्राचं भन्नाट उत्तर
हिमांशू मल्होत्रा
Follow us
| Updated on: Dec 12, 2021 | 1:00 PM

मुंबई : अभिनेता हिमांशू मल्होत्रा (Actor Himanshu Malhotra) आणि अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar)एकत्र काम करतील का, असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना नेहमीच पडलेला असतो. आता यावर खुद्द हिमांशूनंच खुलासा केलाय. यासह त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरही त्यानं विविध मतं मांडलीत. नच बलिये 7(Nach Baliye 7)मध्ये हिमांशू आणि अमृता यांनी भाग घेतला होता आणि ट्रॉफीही जिंकली होती. ‘चिकू की मम्मी दूर की’ (Chiku Ki Mummy Dur Ki) या मालिकेत सध्या तो काम करतो.

अमृता म्हणते… हिमांशूनं सांगितलं, अमृताला त्यांच्यासमोर परफॉर्म करण्यास खूप लाज वाटते आणि त्यांना त्यांचं व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य वेगळं ठेवायला आवडतं. ते सर्व गोष्टींवर विस्तृत चर्चा करतात. तिला (अमृता) माझ्यासमोर अभिनय करायला खूप लाज वाटते. त्यामुळे आम्ही तुम्हाला एकत्र काम करताना दिसणार नाहीत. आमच्यात या विषयावर चर्चा झाली. आम्हाला काही गोष्टी ऑफर करण्यात आल्या आणि ती म्हणाली, की डान्स एक वेगळी गोष्ट होती, अभिनय मात्र आपण एकत्र करू शकत नाहीत. कारण प्रत्येक दिवशी आपल्याला एकमेकांसमोर अभिनय करावा लागेल. आपण शक्य तितकं वास्तविक व्हावं आणि या अभिनय क्षेत्रात येऊ नये, असं मला वाटतं. मला वाटतं, की आमच्याकडेदेखील काम करण्याची एक वेगळी पद्धत आहे. तिची एक वेगळी टीम आहे आणि माझी स्वतःची टीम आहे आणि मला वाटतं की काम करण्याचा आमचा स्वभावही वेगळा आहे, असं हिमांशू म्हणाला.

‘शूट झाल्यावर करतो चर्चा’ अमृता काय विचार करते याबद्दल तो पुढे म्हणाला, की ती म्हणते, मी खूप आनंदी आहे. त्यामुळे सगळ्यांपासून दूर राहूया. एकदा तुम्ही तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात, विशेषत: एक अभिनेता म्हणून मिसळायला सुरुवात केली की संघर्ष व्हायला सुरुवात होईल. आम्ही आमच्या शूटमधून परत आलो की खूप चर्चा करतो. आम्ही आयुष्य, कलाकुसर, कला, नृत्य, निर्मिती, याबद्दल खूप बोलतो.

सुखी जोडपं आयुष्याकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन त्याच्याकडे आहे. आयुष्यात आलेल्या विविध अनुभवांतून तो शिकला, आणि तेच त्याच्या वागण्यातून दिसून येतं. या मालिकेत त्याची एक वेगळी भूमिका आहे. हिमांशू मल्होत्रा आणि अमृता खानविलकर यांनी 24 जानेवारी 2015ला एकमेकांशी लग्न केलं आणि ते एक सुखी वैवाहिक जोडपं आहे.

Happy Birthday Rajinikanth | बस कंडक्टरच नाही तर कधीकाळी कुली म्हणूनही काम केलं, ‘या’ व्यक्तीमुळे रजनीकांत मनोरंजन विश्वात आले!

उत्कंठावर्धक गूढ रहस्यमय घटना,‘शांती भवन’मधील गूढ रहस्य उलगडण्यासाठी अभिनेत्री लीना भागवत सज्ज!

Happy Birthday Umesh Kamat | दोघांच्या वयात जास्त अंतर म्हणून लग्नाचा निर्णय लांबणीवर, अशी होती प्रिया-उमेशची लव्हस्टोरी!

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.