नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझाला हृदयविकाराचा धक्का, मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल

प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांना हृदयविकाराचा धक्का आला आहे. त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझाला हृदयविकाराचा धक्का, मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल
Follow us
| Updated on: Dec 11, 2020 | 5:12 PM

मुंबई : प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांना हृदयविकाराचा धक्का आला आहे. त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रेमो डिसूझावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली असून त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. त्याची पत्नी लीजेल त्याच्याबरोबर आहे. रेमो डिसूझा नृत्यदिग्दर्शक आणि दिग्दर्शक आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांच्या उत्तम नृत्य दिग्दर्शनासाठी आणि ‘फालतू’ आणि ‘एबीसीडी’ चित्रपटांसाठी ओळखले जातात.(Choreographer Remo D’Souza suffered a heart attack and was admitted to Kokilaben Hospital)

रेमो डिसूझाने अनेक हिट चित्रपटांची गाणी कोरिओग्राफ केली आहेत. यानंतर ते डान्स इंडिया डान्सचे जज होते. यशस्वी नृत्यदिग्दर्शक झाल्यावर त्यांनी दिग्दर्शनासाठीही प्रयत्न केला आणि फालतू चित्रपटाचे दिग्दर्शन केले. यानंतर 2013 मध्ये त्यांनी ‘एबीसीडी’ हा डान्सवर आधारित चित्रपट दिग्दर्शित केला. या चित्रपटनंतर त्यांनी 2015 मध्ये एबीसीडी 2 प्रदर्शित केला. या चित्रपटात वरुण धवन, श्रद्धा कपूर आणि प्रभुदेवा मुख्य भूमिकेत होते. कोरिओग्राफी आणि चित्रपटाच्या दिग्दर्शनाशिवाय रेमो डिसूझा एक यशस्वी जज देखील आहेत. डान्स इंडिया डान्ससोबतच ते कलर्सच्या शो झलक दिखलाजा आणि स्टार प्लस ‘डान्स प्लस’वर जज म्हणून त्यांनी उत्तम काम केले आहे.

रेमो डिसूझा यांचा जन्म 2 एप्रिल 1972 रोजी कर्नाटकच्या बेंगळुरू येथे झाला. रमेश यादव असे त्याचे खरे नाव आहे. त्यांच्या वडिलांचे नाव गोपी नायक आहे, रेमो डिसूझा यांनी गुजरातमधील जामनगर येथून शिक्षण घेतले. शाळेच्या दिवसांत तो खूप चांगले खेळाडू होते. त्यावेळी त्यांना अनेक मोठे पुरस्कारही मिळाले होते. डिझाइनर असलेल्या लीजेलशी त्याचे लग्न झाले आहे. त्यांना ध्रुव आणि गबिरिल हे दोन मुलगे देखील आहेत.

संबंधित बातम्या : 

Durgamati | ‘दुर्गामती’ च्या निर्मात्यांना कोट्यावधीचा फटका बसण्याची शक्यता!

KBC 12 | कमजोरीला बनवले शस्त्र, तुम्हाला माहितीय अरुणिमा सिन्हा यांचा थक्क करणारा प्रवास?

जेव्हा पंकजांसमोर साक्षात अजित पवार-शरद पवार अवतरतात…

(Choreographer Remo D’Souza suffered a heart attack and was admitted to Kokilaben Hospital)

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.