Tunisha Sharma death case : अभिनेत्री तुनिशाची हत्या झाली?, एसआयटी चौकशीची मागणी; हत्याप्रकरणाला वेगळं वळण?
तुनिषाची आई वनिता शर्मा यांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तुनिशाचा सहकलाकार शीजान खान याला अटक केली आहे. त्यानंतर त्याची चौकशी केली.
पालघर: टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिने आत्महत्या केल्याने बॉलिवूड आणि खासकरून टीव्ही जगतात एकच खळबळ उडाली आहे. तुनिशा शर्मा हिने आत्महत्या केली असली तरी तिची हत्या झाल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. अनेक अभिनेत्रींना तुनिशाची हत्या झाल्याचं वाटतंय. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे आलिबाबा सीरियलचे कलाकार आणि संपूर्ण स्टाफ घाबरून गेला असून दहशतीच्या सावटाखाली असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
अभिनेत्री तुनिशा शर्मा हिने 24 डिसेंबर रोजी सेटवरच मेकअप रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येनंतर एकच खळबळ उडाली होती. तुनिशाने एवढं मोठं पाऊल का उचललं असा सवाल जो तो विचारत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच सेटवरील लोकही घाबरले असून काहीही सांगण्यास नकार देत आहेत.
एएनआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे. ऑल इंडिाय सिने वर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश गुप्ता यांनी याबाबत एएनआयकडे भाष्य केलं आहे. आज मी सेटवर गेलो होतो. तिथले लोक काहीच सांगत नाहीत. त्यांना कशाची तरी भीती वाटत आहे. ही मर्डरच असल्याचं अनेक अभिनेत्रींनी मला सांगितलं. त्या अभिनेत्रीही घाबरलेल्या आहेत. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी सुरेश गुप्ता यांनी केली आहे.
तुनिषाची आई वनिता शर्मा यांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तुनिशाचा सहकलाकार शीजान खान याला अटक केली आहे. त्यानंतर त्याची चौकशी केली. त्याचं मेडिकल चेकअप केलं आणि नंतर त्याला वसई कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी शीजानला चार दिवसांची रिमांड दिली आहे. या प्रकरणी पोलीस शीजानची कसून चौकशी करत आहे.
TV actor Tunisha Sharma death case: I went to the set today.People there are afraid to tell anything. I’m getting calls from many actresses that it’s murder& they’re also feeling scared.We demand that SIT should probe it: Suresh Gupta,President,All Indian Cine Workers Association pic.twitter.com/bWsbK2qqRs
— ANI (@ANI) December 25, 2022
एसपी चंद्रकांत जाधव यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेतली होती. शीजान आणि तुनिशा एकमेकांसोबत रिलेशनमध्ये होते. त्यानंतर दोघांचा ब्रेकअप झाला. त्यामुळे ती मानसिक तणावाखाली होती. त्यातूनच तिने आत्महत्येचं पाऊल उचललं. अजून पोलीस चौकशी सुरू असून या चौकशीत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे, असं जाधव म्हणाले होते.