AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अतिशय वाईट पद्धतीने लोक स्पर्श करायचे, बोलायची हिंमतही नव्हती..’, लोकांना हसवणाऱ्या भारतीच्या डोळ्यात आले अश्रू!

आपल्या मजेदार स्टाईलने सर्वांना हसवणाऱ्या भारती सिंहने (Bharti Singh) नुकताच असा अनुभव सांगितला की, तो ऐकून तिचे चाहतेही स्तब्ध होतील. वास्तविक, नुकतीच भारती मनीष पॉलच्या नवीन शोमध्ये पोहोचली होती.

‘अतिशय वाईट पद्धतीने लोक स्पर्श करायचे, बोलायची हिंमतही नव्हती..’, लोकांना हसवणाऱ्या भारतीच्या डोळ्यात आले अश्रू!
भारती सिंह
| Edited By: | Updated on: Jul 18, 2021 | 10:01 AM
Share

मुंबई : आपल्या मजेदार स्टाईलने सर्वांना हसवणाऱ्या भारती सिंहने (Bharti Singh) नुकताच असा अनुभव सांगितला की, तो ऐकून तिचे चाहतेही स्तब्ध होतील. वास्तविक, नुकतीच भारती मनीष पॉलच्या नवीन शोमध्ये पोहोचली होती. या दरम्यान भारतीने तिच्या वैयक्तिक ते व्यावसायिक जीवनापर्यंतचे अनेक खुलासे केले. सुरुवातीला कार्यक्रम समन्वयक तिच्याशी कसे गैरवर्तन करायचे, हे भारतीने सांगितले. ती म्हणाली, ‘बर्‍याच वेळा जे कार्यक्रमाचे संयोजक होते ते चुकीचे वागत असत. माझ्या पाठीवर हात फिरवायचे. मला ते अजिबात आवडत नव्हतं, पण नंतर असं वाटायचं की ते माझ्या काकांच्या वयाचे आहेत, मग ते असं का वागतील.’

भारतीने म्हणते की, आता तिला समजले आहे की ते सर्व चूक होतं. ती म्हणाली, ‘त्यावेळी मला या सर्व गोष्टी समजल्या नाहीत. या व्यतिरिक्त आता माझ्यात जो आत्मविश्वास आहे तो यापूर्वी कधीही नव्हता. आता मी बेधडकपणे  म्हणू शकते की, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही काय पहाताय, बाहेर जा, वैगरे…पण त्यावेळी माझ्यात ही हिंमत नव्हती.’

लोक आईबरोबरही चुकीचे वागत

भारतीने तिचे बालपण आणि तिच्या आईने कठीण काळात कशा प्रकारे समाजाचा सामना केला याबद्दलही सांगितले. भारती म्हणाल्या, ‘काही लोक एकदम घरात शिरले आणि त्यांनी कर्ज परताव्याचे पैसे कसे मागितले, हे मी पाहिले आहे. ते अगदी माझ्या आईचा हात धरायचे. ते तिच्याशी वाईट वागतायत, हे मला त्यावेळी माहित नव्हते. एकदा कुणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला, मग आई चिडून म्हणाली की, तुला लाज वाटली नाही का? मला नवरा नाही पण लहान मुले आहेत, म्हणून तुम्ही असं कराल का?’ भारती म्हणाली की, त्यावेळी तिची आई केवळ 24 वर्षांची होती.

बालपणात भोगले दुःख

भारतीने सांगितले की, बालपणात तिला आणि तिच्या कुटुंबियांना बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागला. वडिलांच्या मृत्यूनंतर तिची आई व बहिण एका कारखान्यात काम करत आणि एका दुकानात भाऊ काम करायचा. याशिवाय त्याची आई इतरांच्या घरी जेवण बनवायची. बऱ्याच वेळा असे घडायचे की, स्वतःच्याच घरात भाजीपालासुद्धा नसायचा. भारती म्हणाली, आम्ही कोरी चहा, रोटी आणि मीठ खाऊन झोपायचो.

भारती पुढे म्हणाली की, तिची आई शिवणकाम करायची. घरात नेहमीच मशीन चालण्याचा आवाज यायचा. आजही जेव्हा ती सेटच्या कॉस्ट्यूम रूममध्ये जाते, तेव्हा ती यंत्राचा आवाज ऐकून घाबरते. ती म्हणाली, ‘मी या आवाजामध्ये 21 वर्षे राहिलेय आणि आता मला त्या आवाजाकडे परत जाण्याची इच्छा नाही. आम्ही मीठ-चपाती खाल्ली, पण आज डाळ, भाज्या आणि रोटी खातो. मी माझ्या कुटुंबास कधीही जुन्या परिस्थितीत पाहू इच्छित नाही.’

(Comedian Bharti Singh tears down while sharing her bad experience in life)

हेही वाचा :

Ravi Kishan Net Worth | भोजपुरी सुपरस्टार रवी किशन करतो लाखोंची कमाई, जाणून घ्या अभिनेत्याची एकूण संपत्ती किती?

Video | तब्बल 1200 किलोमीटरचा सायकल प्रवास करून चाहता सोनू सूदच्या भेटीला, पाहा अभिनेत्याने कसे केले स्वागत…

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.