तेव्हा जीवन संपवण्याचा करण्याचा विचार करत होतो, कपिल शर्मा यांचा मोठा खुलासा; कारणही सांगितलं
कपिल शर्मा हा गेल्या कित्येक वर्षांपासून आपल्या चाहत्यांना पोटधरून हसवण्याचे काम करत आहे. कपिल शर्मा याची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे. कायमच कपिल शर्मा हा चर्चेत राहतो.
मुंबई : गेल्या कित्येक वर्षांपासून कपिल शर्मा हा त्याच्या शोमधून प्रेक्षकांना हसवण्याचे काम करत आहे. द कपिल शर्मा (The Kapil Sharma Show) शोच्या माध्यमातून कपिल शर्मा आणि त्याची टिम प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसते. गेल्या काही दिवसांपासून कपिल शर्मा हा त्याच्या ज्विगाटो या चित्रपटामुळे चर्चेत आहे. कपिलच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विदेशातही या चित्रपटाला (Movie) चाहत्यांचे प्रेम मिळत आहे. बऱ्याच वर्षांनंतर ज्विगाटो या चित्रपटाच्या माध्यमातून कपिल शर्मा (Kapil Sharma) याने मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. कपिल शर्मा याने काॅमेडीसोबतच बाॅलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरूवात केलीये.
नुकताच कपिल शर्मा हा सुधीर चौधरी यांच्या शोमध्ये पोहचला. यावेळी कपिल शर्मा याने काही मोठे खुलासे केले आहेत. इतकेच नाहीतर यावेळी कपिल शर्मा याने त्याच्या आयुष्यातील काही वाईट दिवसांबद्दल देखील सांगितले आहे. कपिल शर्मा याच्या मनामध्ये आत्महत्या करण्याचा विचार देखील आला होता. आता कपिल शर्मा यावर मोठा खुलासा करण्याची दाट शक्यता आहे.
कपिल शर्मा म्हणाला की, माझ्या आयुष्यात मी आत्महत्या करण्याचा विचार केला होता. मला वाटत होते की, माझे ऐकणारे कोणीही माझ्याजवळ नाहीये. मला वाटत होते कोणीच माझे नाहीये. कोणीही माझे ऐकायला, मला समजून घेणारे, माझी काळजी करणारे नव्हते. माझ्याजवळ असलेले लोक फक्त माझा फायदा घेण्यासाठी होते. खास करून कलाकार लोक…
कॉमेडियन कपिल शर्मा याच्या आयुष्यामध्ये एककाळ असा आला होता की, तो डिप्रेशनमध्ये गेला होता. आता या शोमध्ये कपिल शर्मा अजून काही मोठे खुलासे करू शकतो. कपिल शर्मा याने त्याच्या करिअरमध्ये खूप मोठा संघर्ष केला आहे. कपिल शर्मा याच्या शोमध्ये बाॅलिवूडमधील जवळपास सर्वच कलाकार हे चित्रपटांचे प्रमोशन करण्यासाठी येतात.
काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार हा कपिल शर्मा याच्या शोमध्ये त्याच्या सेल्फी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी पोहचला होता. यावेळी अक्षय कुमार आणि कपिल शर्मा यांनी धमाल केली. एका मागून एक असे अक्षय कुमार याचे तब्बल पाच चित्रपट हे बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेले आहेत. सेल्फी हा चित्रपट देखील अक्षय कुमार याचा फ्लाॅप गेलाय. अक्षय कुमार याच्या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे दिसत आहे.