Love story | नेहमीच हीना खानचा आधार बनला बॉयफ्रेंड रॉकी जयस्वाल, नॅशनल टीव्हीवर केलं प्रपोज!

2009 मध्ये 'ये रिश्ता क्या कहलाता है' या शोच्या माध्यमातून अभिनेत्री हिना खान (Hina Khan) हीने टीव्ही विश्वामध्ये पदार्पण केले होते. या शोमुळे ती घरोघरी प्रसिद्ध होईल असं, हिनाला देखील वाटलं नसेल. त्याबरोबरच या शो मुळे तिला आपलं आयुष्यभराचं प्रेमही मिळेल, असं वाटलं नसेल.

Love story | नेहमीच हीना खानचा आधार बनला बॉयफ्रेंड रॉकी जयस्वाल, नॅशनल टीव्हीवर केलं प्रपोज!
हीना आणि रॉकी
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 4:18 PM

मुंबई : 2009 मध्ये ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या शोच्या माध्यमातून अभिनेत्री हीना खान (Hina Khan) हीने टीव्ही विश्वामध्ये पदार्पण केले होते. या शोमुळे ती घरोघरी प्रसिद्ध होईल असं, हिनाला देखील वाटलं नसेल. त्याबरोबरच या शो मुळे तिला आपलं आयुष्यभराचं प्रेमही मिळेल, असं वाटलं नसेल. हीनाचा बॉयफ्रेंड रॉकी जयस्वाल (Rocky Jaiswsal) या शोमध्ये सुपरवायझिंग प्रोड्युसर म्हणून काम करत होता. दोघे याच सेट भेटले, मैत्री झाली आणि नंतर ते एकमेकांच्या खूप जवळ आले. एका मुलाखतीत रॉकीने सांगितले की, हिनामध्ये त्याला काय-काय आवडते (Cute love story of Hina khan And Rocky Jaiswal).

रॉकी म्हणाला, ‘आम्ही पहिल्यांदा ‘ये रिश्ता क्या कहलाता है’च्या सेटवर भेटलो होतो. मला तिच्याबद्दल जे आवडते ते म्हणजे, ती खूप मेहनती आहे. मी बर्‍याच कलाकारांना भेटलो होते, पण हीना खूप हुशार आहे. अशा व्यक्तीला भेटणे विरळच आहे. याशिवाय ती जगातील सर्वात गोड मुलगी आहे.’

हिना आणि रॉकी देखील चांगली मित्र आहेत

जर तुमचा पार्टनर तुमचा मित्र असेल, तर तुमचे संबंध आणखी मजबूत होतात. हिना आणि रॉकीच्या नात्यात हीच खास गोष्ट आहे. हिना म्हणाली होती की, आम्ही दोघेही बेस्ट फ्रेंड आहोत. त्याच वेळी, दोघेही कधीकधी एकमेकांच्या काही कृत्यांबद्दल अस्वस्थ देखील होतात. रॉकीने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘मला तिच्यात आवडत नसलेली एक गोष्ट म्हणजे ती बोलताना कधीच विचार करत नाही. कसे व्यक्त व्हावे हे तिला काळात नाही.’

नात्याबद्दल गुप्तता

दोघांनीही आपलं नातं सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं. दोघांनी 8 वर्षे एकत्र काम केले. पण त्यावेळी दोघांनीही एकमेकांना केवळ मित्र म्हटले होते. पण, मग ‘खतरों के खिलाडी’ सीझन 8मध्ये अचानक रॉकी हिनाला साथ देण्यासाठी आला. खरं तर हिनाने एक पोस्ट लिहिली होती. याच पोस्टमुळे रॉकी देखील सेटवर आला होता. ज्यानंतर चाहत्यांना हे नाते कळले होते.

टीव्हीवर प्रपोज

त्याचवेळी हिना बिग बॉसमध्ये गेली तेव्हा रॉकी तिला भेटायला आला आणि तिला नॅशनल टीव्हीवर प्रपोज केले. रॉकी म्हणाला होता, ‘तुला माहिती आहे, आपण एकत्र खूप वेळ घालवला आहे. तुझ्याशिवाय मी पाहिलेले दिवस यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही. बिग बॉस संपताच तुझा सगळा वेळ माझ्या आयुष्यासाठी दे, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो.’ यावर हीनाने देखील होकार दिला होता.

कुटुंबाने दिला होकार

दोघांनीही आपल्या कुटूंबाची एकमेकांशी ओळख करून दिली आणि त्यांच्या कुटुंबाला दोघांच्या या नात्यात काही अडचण नव्हती. दोघेही एकमेकांच्या कुटुंबासमवेत वेळ घालवत असतात. हिना रॉकीच्या कुटूंबियांसह रक्षाबंधन, होळी साजरा करते, तर रॉकी हिना आणि तिच्या कुटूंबियांसह ईद साजरा करतो.

दोघांनीही आनंद आणि दुःखात एकमेकांना नेहमीच साथ दिली आहे. हीनाच्या वडीलांचे नुकतेच निधन झाले, तेव्हा रॉकी तिचा आधार बनला. हीनाची तब्येत ढासळली होती, तेव्हा तो प्रत्येक क्षणी तिच्याबरोबर होता. लवकरच ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे.

(Cute love story of Hina khan And Rocky Jaiswal)

हेही वाचा :

Indian Idol 12 | सोशल मीडियावर ट्रोल होतेय षण्मुखप्रिया, जावेद अख्तर यांनी सांगितलं कारण!

Throwback | ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलंत का? कारकीर्दीच्या पहिल्या फोटोशूटमधील फोटो पाहून चाहतेही अवाक्!

बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....