फोटोसाठी कायपण! प्रेग्नंट अभिनेत्रीने घातले हाय हिल्स; नेटकऱ्यांनी ट्रोल करताच म्हणाली..

अभिनेत्री डेबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) आणि अभिनेता गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary) हे टीव्हीवरील सर्वांत लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. या दोघांची केमिस्ट्री नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. गुरमीत आणि डेबिनाने ‘रामायण’ या मालिकेत एकत्र काम करून लोकप्रियता मिळवली.

फोटोसाठी कायपण! प्रेग्नंट अभिनेत्रीने घातले हाय हिल्स; नेटकऱ्यांनी ट्रोल करताच म्हणाली..
Debina Bonnerjee and GurmeetImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 3:01 PM

अभिनेत्री डेबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) आणि अभिनेता गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary) हे टीव्हीवरील सर्वांत लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. या दोघांची केमिस्ट्री नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. गुरमीत आणि डेबिनाने ‘रामायण’ या मालिकेत एकत्र काम करून लोकप्रियता मिळवली. 2008 मध्ये प्रसारित झालेल्या या मालिकेने दोघांनाही प्रेक्षकांची पसंती मिळवून दिली. याच मालिकेत काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. 2011 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. डेबिना लवकरच आई होणार आहे. बेबी बंप दाखवतानाचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करतेय. अशाच एका व्हिडीओवरून तिच्यावर नेटकऱ्यांकडून टीका होतेय. या व्हिडीओमध्ये गुरमीत डेबिनाच्या पायात हाय हिल्सचे सँडल घालताना दिसत आहे. डेबिना आणि गुरमीतने एक फोटोशूट केला असून त्यासाठीच तिने हाय हिल्स घातले आहेत. मात्र प्रेग्नंसीमध्ये (pregnancy) हाय हिल्स घालणं बाळाच्या आरोग्यासाठी योग्य नसल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

नेटकऱ्यांनी तिच्या व्हिडीओवर कमेंट करत बाळाच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली. प्रेग्नंट असताना होणाऱ्या आईने हाय हिल्स घालू नये, कारण ते बाळासाठी आरोग्यदायी नाही, असे कमेंट्स त्यांनी केले. यावर आता एका व्लॉगच्या माध्यमातून डेबिनाने उत्तर दिलं आहे. “डॉक्टरांपासून ते सामान्य लोकांपर्यंत.. अनेकजण मला विविध सल्ले देत आहेत. मी ते हाय हिल्स घालून फक्त फोटोशूट केलं. गुरमीतने ते हिल्स पायात घालण्यात माझी मदत केली आणि त्याचा फक्त व्हिडीओ शूट करण्यात आला. ते हिल्स घालून मी चालले नाही आणि पळालेही नाही. त्यामुळे कृपया समजून घ्या. मी ते हिल्स घालून मॅरेथॉनमध्ये पळेन की काय असा विचार करून राग व्यक्त करू नका”, असं ती म्हणाली.

डेबिनाच्या या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल-

डेबिनाने 9 फेब्रुवारी 2020 रोजी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत चाहत्यांना गोड बातमी दिली. ‘ज्युनियर चौधरी लवकरच येणार आहे..’ असं कॅप्शन देत तिने फोटो पोस्ट केला होता. ‘रामायण’ या मालिकेनंतर डेबिनाने चिडिया घर या मालिकेत भूमिका साकारली. गुरमीतसोबत तिने काही रिअॅलिटी शोजमध्येही भाग घेतला होता. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग असून डेबिना इन्फ्लुएन्सरसुद्धा आहे.

हेही वाचा:

The Kashmir Files कोरोनानंतरचा ब्लॉकबस्टर चित्रपट; रोहित शेट्टीच्या ‘सूर्यवंशी’ला ही कमाईत टाकलं मागे

अंकिता लोखंडेचा पती बनलाय घरजावई, 2 वर्षांपासून राहतोय तिच्यात घरी; नेमकं काय आहे कारण?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.