Devmanus | ‘देवमाणूस’मध्ये नवी ठसकेबाज एंट्री, ‘या’ व्यक्तीला पाहून देवीसिंगलाही येणार भोवळ! पाहा कोण आहे ‘ही’ अभिनेत्री…

तुरुंगात असूनही या ‘देवमाणसा’चे कारनामे अद्याप सुरुच आहेत. आता मालिकेत अशा एका व्यक्तीची एंट्री होणार आहे, जिला पाहून देवीसिंगला देखील भोवळ येणार आहे.

Devmanus | ‘देवमाणूस’मध्ये नवी ठसकेबाज एंट्री, ‘या’ व्यक्तीला पाहून देवीसिंगलाही येणार भोवळ! पाहा कोण आहे ‘ही’ अभिनेत्री...
देवमाणूस
Follow us
| Updated on: Jul 13, 2021 | 4:39 PM

मुंबई : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ (Devmanus) सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत डॉ. अजित कुमार देव उर्फ देवीसिंग याला अटक करण्यात आली असून, त्याच्यावरील गुन्हे सिद्ध करण्यासाठी कोर्ट केस सुरु झाली आहे. तुरुंगात असूनही या ‘देवमाणसा’चे कारनामे अद्याप सुरुच आहेत. आता मालिकेत अशा एका व्यक्तीची एंट्री होणार आहे, जिला पाहून देवीसिंगला देखील भोवळ येणार आहे.

डॉ. अजित कुमार देवच देवीसिंग आहे हे पटवून देण्यासाठी तो कंपाऊंडर म्हणून काम करत असलेल्या मुंबईतील डॉक्टरांना साक्ष देण्यासाठी कोर्टात हजर केले गेले होते. मात्र, या दरम्यान देखील त्याने अनेक उलट प्रश्नांचा भडीमार करत त्या डॉक्टरांची साक्ष पिटाळून लावली. मात्र, तोच देवीसिंग नसल्याचे त्याचे म्हणणे खरे करण्यासाठी तो नवनवीन क्लृप्त्या काढत आहे. आता त्याने आपल्या जुळ्या भावाचे अर्थात खऱ्या डॉ. अजितकुमार देव याची कागदपत्र सादर करून आपणच डॉक्टर असल्याचे सिद्ध केले आहे.

नव्या व्यक्तीची एंट्री :

मालिकेत आता ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम ‘वहिनीसाहेब’ अर्थात अभिनेत्री माधुरी पवारची (Madhuri Pawar) एंट्री होणार आहे. माधुरी या मालिकेत नेमकी कोणती भूमिका साकारणार, हे अद्याप समोर आलेले नाही. मात्र, नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये माधुरीची ठसकेबाज एंट्री पाहायला मिळत आहे. या मालिकेतही नेहमीप्रमाणे माधुरी धडाकेबाज भूमिका साकारणार आहे. तर, कोर्टात उभ्या असलेल्या देवीसिंगला तिला पाहून चक्कर येणार आहे. आता ‘ही’ व्यक्ती अजित कुमारची नेमकी कोण असणार, याची उत्सुकता सर्वाना लागून राहिली आहे.

पाहा प्रोमो :

कोण आहे माधुरी पवार?

मालिका विश्वात राणा आणि अंजलीची जोडी चांगलीच चर्चेत होती. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत इतर पात्रांप्रमाणे ‘नंदिता वहिनीं’ची (Nandita Vahini) खलनायकी भूमिकाही तितकीच लक्षवेधी ठरली होती. मालिकेतील ‘वहिनी साहेबां’चे पात्र संवाद आणि तिच्या हटके स्टाईलमुळे लोकप्रिय झाले होते. ‘नंदिता’ साकारणाऱ्या अभिनेत्री धनश्री काडगांवकरने मालिकेला ‘रामराम’ म्हटल्याने कथेत ट्विस्ट आला होता. फसवेगिरी आणि कटकारस्थानासाठी शिक्षा भोगत असलेल्या नंदिता वहिनी म्हणजेच वहिनीसाहेबांनी मालिकेत पुन्हा एंट्री घेतल्यावर नव्या वहिनीसाहेब कोण असणार याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता होतीच.

एकीकडे या मालिका शेवटच्या टप्प्यात होती. तर प्रेक्षक देखील वहिनीसाहेबांना मिस करत होते. प्रेक्षकांची हीच उत्सुकता लक्षात घेता माधुरीच्या रुपात ‘नंदिता वहिनी’ची मालिकेत पुन्हा एकदा दमदार एंट्री झाली होती. धनश्री काडगावकरने मालिकेला गुडबाय म्हटल्याने ही भूमिका माधुरीकडे आली. या पात्राचं वेगळेपण जपत माधुरी देखील प्रेक्षकांच्या मनात आणि घराघरांत पोहोचली.

(Devmanus serial new entry actress Madhuri Pawar will enter in serial)

हेही वाचा :

Nilu Phule Death Anniversary | एक असा खलनायक, जो एकही डॉयलॉग न बोलता, भय निर्माण करायचा

‘राणादा’ला मिळाली ‘अंकिता’ची साथ, नवी जोडी, नवा “डाव”

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.