Video | डोक्यावर केक घेऊन राखी सावंतचा डान्स, नवं टॅलेंट पाहून चाहते म्हणतायत ‘वन्स मोअर’

राखी सावंतचा हा व्हिडीओ एका सेलिब्रेशन दरम्यानचा आहे. वास्तविक, नुकतेच राखी सावंत हिचे 'मेरे ड्रीम में तेरी एंट्री' या म्युझिक व्हिडीओवर 60 लाख व्ह्यू पूर्ण झाले आहेत. हा खास प्रसंग साजरा करण्यासाठी म्युझिक व्हिडीओ टीम एकत्र आली.

Video | डोक्यावर केक घेऊन राखी सावंतचा डान्स, नवं टॅलेंट पाहून चाहते म्हणतायत ‘वन्स मोअर’
राखी सावंत
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 10:31 AM

मुंबई : बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी नर्तिका-अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) अतिशय वेगळ्या प्रकारे लोकांचे मनोरंजन करण्यासाठी ओळखली जाते. अलीकडेच, तिने आपल्या गाण्याचे प्रचार करण्यासाठी रस्त्याच्याकडेला असलेल्या ऑटो रिक्षाचालकांसह नाचण्यास सुरुवात केली होती. आता तिचा असाच एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती चक्क डोक्यावर केक ठेवून नाचताना दिसत आहे (Drama Queen Rakhi Sawant Dance with Cake goes viral).

हिट झाले राखी सावंतचे गाणे

राखी सावंतचा हा व्हिडीओ एका सेलिब्रेशन दरम्यानचा आहे. वास्तविक, नुकतेच राखी सावंत हिचे ‘मेरे ड्रीम में तेरी एंट्री’ या म्युझिक व्हिडीओवर 60 लाख व्ह्यू पूर्ण झाले आहेत. हा खास प्रसंग साजरा करण्यासाठी म्युझिक व्हिडीओ टीम एकत्र आली होती आणि लोकेशन सजवण्यासोबतच येथे केक कटिंग सोहळाही आयोजित करण्यात आला होता.

डोक्यावर केक ठेवून नाचली अभिनेत्री

राखी सावंतने केक पाहिला तेव्हा तिने काहीतरी वेगळे आणि हटके करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तिने चक्क हा केक आपल्या डोक्यावर ठेवला आणि आपल्या गाण्याच्या बीट्सवर नाचू लागली. राखी सावंत हीचं हे नवं कौशल्य पाहून तिथे उपस्थित सर्व लोक तिचे चाहते बनले आणि तिला वन्स मोअर म्हणायला लागले. यावर राखी (Rakhi Sawant) पुन्हा एकदा केक डोक्यावर ठेवून नाचली. राखीचा हा व्हिडीओ सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी शेअर केला आहे.

पाहा व्हिडीओ :

राखीचे नवे गाणे प्रदर्शित

नुकतेच राखी सावंत हिचे ‘तेरे ड्रीम मी मेरी एंट्री’ हे नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे खूपच पसंत केले जात आहे. राखीने तिच्या जबरदस्त डान्स मूव्ह्सने चाहत्यांची मने जिंकली आहेत. हे गाणे ज्योतिका टांगरी यांनी गायले आहे आणि परीक्षितने रॅप केले आहे. गौर दास दासगुप्ता याने संगीत दिले असून, विश्वास राणे यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत.

बिग बॉसच्या घरात धमाल

काही वेळाने राखीने तो केक डोक्यावरून खाली ठेवला आणि म्हणाली, ‘मी ठेवते तो केक खाली, नाहीतर पडून खराब होईल.’ यानंतर राखी तिच्या गाण्यावर इतर लोकांसह नाचताना दिसली. ड्रामा क्वीन राखी सावंत बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर तिचा हा म्युझिक व्हिडीओ पहिला प्रकल्प आहे. त्याचे हे गाणे चांगलेच हिट ठरले आहे आणि लोकांना चांगलेच आवडू लागले आहे.

(Drama Queen Rakhi Sawant Dance with Cake goes viral)

हेही वाचा :

PHOTO | लाल भडक स्विमिंगसूटसह लेदर पँटचं बोल्ड कॉम्बिनेशन, खुशी कपूरच्या फोटोशूटने चित्रपटवर्तुळात चर्चा!

दिग्दर्शकाच्या सांगण्यावरून महिमा चौधरीने बदलले नाव, करिअर यशाचं श्रेय देताना म्हणाली…

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.