अर्चना गाैतम विरोधात संतापाची लाट, शिव ठाकरे याच्या डोळ्याला मोठी दुखापत, चाहते आक्रमक

बिग बाॅसच्या निर्मात्यांनी थेट कार्य थांबवण्याच्या सूचना दिल्या. आज बिग बाॅसमध्ये विकेंडचा वार पार पडणार असून सलमान खान ऐवजी करण जोहर हा बिग बाॅसच्या घरातील सदस्यांचा क्लास लावताना दिसेल.

अर्चना गाैतम विरोधात संतापाची लाट, शिव ठाकरे याच्या डोळ्याला मोठी दुखापत, चाहते आक्रमक
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 6:57 PM

मुंबई : बिग बाॅस १६ चे यंदाचे सीजन TRP मध्ये मोठा हंगामा करताना दिसत आहे. बिग बाॅस (Bigg Boss) १५ TRP मध्ये काही धमाका करू न शकल्याने यावेळी बिग बाॅसच्या निर्मात्यांनी अगोदरच कंबर कसली होती. सीजन हीट करण्यासाठी प्रत्येक प्रयत्न हे निर्मात्यांनी केले. यावेळी बिग बाॅस देखील मैदानात उतरले आहेत. घरातील सदस्यांवर बिग बाॅसचे अत्यंत बारीक लक्ष असल्याचे दिसून आले. बिग बाॅस १६ च्या फिनालेला अवघे काही दिवस शिल्लक असताना घरामध्ये मोठा हंगामा होताना दिसत आहे. नुकताच बिग बाॅसच्या घरात टाॅर्चर टास्क पार पडला आहे. या टास्कमध्ये अर्चना गाैतम (Archana Gautam) हिने हद्दपार केली आणि शिव ठाकरे, निम्रत काैर आणि एमसी स्टॅन यांच्या डोळ्यांमध्ये निरमा आणि हळद टाकली. अर्चना आणि प्रियंकाचे हे रूप पाहून बिग बाॅसच्या निर्मात्यांनी थेट कार्य थांबवण्याच्या सूचना दिल्या. आज बिग बाॅसमध्ये विकेंडचा वार पार पडणार असून सलमान खान ऐवजी करण जोहर हा बिग बाॅसच्या घरातील सदस्यांचा क्लास लावताना दिसेल.

टाॅर्चर टास्कमध्ये अर्चना गाैतम ही शिव ठाकरे याच्या डोळ्यात असे काहीतरी टाकते की, थेट शिव ठाकरेच्या डोळ्याला दुखापत होते. शिव ठाकरे याला आपला डोळा उघडणे देखील कठीण होऊन बसले आहे. शिव ठाकरे याचा डोळा पूर्णपणे लाल झाला आहे.

विकेंडच्या वारमध्ये याच गोष्टीमुळे करण जोहर हा अर्चना गाैतम आणि प्रियंका चाैधरीचा क्लास लावतो. कारण टाॅर्चर टास्कच्या अगोदर प्रियंका चाैधरी अर्चना गाैतम हिला म्हणते की, टास्कमध्ये तुला जे करायचे आहे ते कर…

प्रियंकाच्या याच बोलण्याचा नेमका अर्थ करण जोहर हा तिला विचारतो. मात्र, नेहमीप्रमाणे प्रियंका हातवर करते. करण जोहर याच्या निशाण्यावर अर्चना गाैतम येते. अर्चना गाैतम हिला करण जोहर म्हणतो की, अशाप्रकारे टास्क खेळणे अत्यंत चुकीचे आहे. तुझ्यामुळे शिव ठाकरे याच्या डोळ्याला काय झाले हे पाहा.

यावर अर्चना गाैतम करण जोहर याला म्हणते की, मी त्याची अगोदरच माफी मागितली आहे. यावर करण जोहर चिडून म्हणतो की, माफी मागितली म्हणजे सर्व झाले का? फक्त शिव ठाकरे याच्या डोळ्यालाच नाही तर निम्रतच्या चेहऱ्यावरही दुखापत झालीये.

टाॅर्चर टास्क दरम्यान अनेक वेळा शालिन भनोट याने निम्रत काैरला बकेट मारली. इतकेच नाही तर प्रियंका चाैधरी हिने थेट एमसी स्टॅनला बकेट मारली होती. निरमा अर्चना गाैतम ही सर्वांच्या डोळ्यात टाकत होती.

टाॅर्चर टास्कमध्ये अर्चना गाैतम आणि प्रियंका चाैधरीचे खतरनाक रूप पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर लोक अर्चना गाैतम हिच्यावर टीका करताना देखील दिसत आहेत. शिव ठाकरे याचे चाहते ही यासर्व प्रकारानंतर आक्रमक झाल्याचे दिसत असून त्यांनी बिग बाॅसच्या निर्मात्यांना टार्गेट केले आहे.

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.