EXCLUSIVE : 100 पैकी 99 महिलांना ब्रा नको, त्यावर बोलणं धाडस कसलं? : हेमांगी कवी

प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी-धुमाळ (Hemangi Kavi) सध्या तिच्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. हेमांगीच्या या पोस्टनंतर अनेकांनी मोकळेपणाने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. याच संदर्भात आता हेमांगी कवीने TV9मराठीशी खास बातचीत केली.

EXCLUSIVE : 100 पैकी 99 महिलांना ब्रा नको, त्यावर बोलणं धाडस कसलं? : हेमांगी कवी
Actress Hemangi Kavi
Follow us
| Updated on: Jul 13, 2021 | 7:09 PM

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी-धुमाळ (Hemangi Kavi) सध्या तिच्या ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. हेमांगीच्या या पोस्टनंतर अनेकांनी मोकळेपणाने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. याच संदर्भात आता हेमांगी कवीने TV9मराठीशी खास बातचीत केली.

हेमांगी कवी काय म्हणाली?

आम्ही अभिनय क्षेत्रात कार्यरत आहोत. अनेक वेळा आम्हाला ट्रोल केलं जातं, आम्ही सोशल मीडियावर कसं यावं, कसं बाहेर पडायवं हे आता समाज ठरवणार का? मी विदाऊट मेकअप गलिच्छ दिसते, असं देखील मला म्हटलं जातं. माझा सोशल मीडिया आहे, मला ठरवू द्या, मी कसं समोर यायचं. मेकअप करणे, अभिनय करणे हा माझा जॉब आहे. तो माझ्या कामाचा भाग आहे.  पण मी माणूस आहे, मला प्रेशराईज केलं जातं.

मी एक पोळी लाटतानाचा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर मला खूप मेसेज आले. त्या व्हिडीओत माझे बूब्ज हलताना दिसतायेत वगैरे असं म्हटलं गेलं. त्याच्यावर अनेकांनी भाष्य केलं. तू मूर्ख आहेस, कामं मिळवण्यासाठी काहीही करतेस का? माझ्या घरी मुलगी असती तर, कानफडवलं असतं वगैरे असं म्हटलं. 7-8 बायकांनी तर मला सांगितलं डिसेंट वाग, डिसेंट कपडे घाल. एक स्त्री असं म्हणते, मला संताप आणि दु:ख वाटलं. बाईच बाईला हे सांगते.

पण कशासाठी? ती स्वत:च यातून जात असते. आपण 100 बायकांना विचारलं, तुम्हाला ब्रा घालायला आवडतं का, तर 99 म्हणतील नाही, नकोसं वाटतं. मग अभिनेत्री किंवा कोणत्याही मुलीवर हे का लादलं जातं? तुमचं मत असेल, तर तुमच्याजवळ ठेवा. मी का करते, कशासाठी करते, पैसे मिळवायचे आहे का, याबाबत लोक जजमेंटल होतात, त्यावरुन मी व्यक्त झाले.

महिलांनी बुजरेपणा सोडून व्यक्त व्हावं!

महिलांनी देखील यावर व्यक्त व्हावं हे सांगताना हेमांगी म्हणाली की, कालच्या पोस्टनंतर अनेकांनी माझ्या धाडसाचं कौतुक केलं. मला आवडलं. पण इतकीशी गोष्ट बोलण्यासाठी धाडस लागत, हेच मुळात वेगळं होतं. ब्रा म्हणजे एक साधा कपड्याचा भाग आहे, त्यात धाडसाचं काय? पण इथूनच खरी सुरुवात आहे. मला वाटलं की काही बायका तरी असं म्हणतील की, तुझी ही पोस्ट वाचून मीही ब्रा घालणार नाही. पण असं धाडस अजूनही कोणी केलेलं नाही. खूप स्ट्रगल बाकी आहे आपला. मुलींनी स्वतःहून पुढे येऊन याबद्दल बोललं पाहिजे, की हो मी ब्रा वापरणार नाही. आणि कोणी बोललंच तर, ती बेधडकपणे उत्तर देईल. लाजणार नही आणो ओढणी वैगरे घेऊन गप्प बसणार नाही!

पाहा हेमांगीची पोस्ट :

(EXCLUSIVE actress Hemangi Kavi share her thoughts on her viral post about bra)

हेही वाचा :

“ज्यांना ब्रा आवडीने घालाविशी वाटते, त्यांनी…” बाई, बुब्स आणि ब्रा… अभिनेत्री हेमांगी कवीचं सडेतोड मत

‘अनेकांच्या मनातील गुदमरणारे विषय मोकळे केलेस!’ सोशल मीडियावर होतेय अभिनेत्री हेमांगी कवीचे कौतुक!

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.