Friendship : मैत्रीसाठी काहीही..! पद्मिनीनं पळून जाऊन लग्न केल्यानंतर ‘या’ अभिनेत्रीनं दिले दागिने

Zee Tvच्या सिंगिंग रिअॅलिटी शो 'सारेगामापा'मध्ये दिग्गज अभिनेत्री पूनम ढिल्लन (Poonam Dhillon) आणि पद्मिनी कोल्हापुरे (Padmini Kolhapure) 'फ्रेंडशिप स्पेशल एपिसोड'(Friendship Day Special)मध्ये खास पाहुण्या म्हणून आल्या होत्या.

Friendship : मैत्रीसाठी काहीही..! पद्मिनीनं पळून जाऊन लग्न केल्यानंतर 'या' अभिनेत्रीनं दिले दागिने
पद्मिनी कोल्हापुरे, पूनम ढिल्लन
Follow us
| Updated on: Dec 18, 2021 | 9:05 PM

मुंबई : Zee Tvच्या सिंगिंग रिअॅलिटी शो ‘सारेगामापा’मध्ये दिग्गज अभिनेत्री पूनम ढिल्लन (Poonam Dhillon) आणि पद्मिनी कोल्हापुरे (Padmini Kolhapure) ‘फ्रेंडशिप स्पेशल एपिसोड'(Friendship Day Special)मध्ये खास पाहुण्या म्हणून आल्या होत्या. 80च्या दशकातल्या या बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री एकमेकांच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत आणि त्यांनी या स्पेशल एपिसोडमधल्या सर्व परफॉर्मन्सचा आनंद घेऊन केवळ स्पर्धकांना प्रोत्साहन दिलं नाही तर एकमेकांशी संबंधित काही मनोरंजक गोष्टीही उघड केल्या.

हरवली आठवणींमध्ये… सारेगामापाच्या प्रत्येक स्पर्धकानं शूटिंगदरम्यान या दोघींनाही इम्प्रेस केलं. ‘तेरा यार हूँ मैं’ या गाण्यावर सचिन आणि स्निग्धजीतच्या परफॉर्मन्सनं पूनम आणि पद्मिनी या दोघींना प्रभावित केलं. पूनम आठवणींमध्ये हरवली होती. यानंतर तिनं काही इंट्रेस्टिंग किस्सेही सांगितले. आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध पद्मिनीनं कसं लग्न केलं हे सांगताना पूनम जुन्या आठवणींमध्ये हरवून गेली.

‘पूनम खूप उदार’ या एपिसोडमध्ये पूनम ढिल्लननं पद्मिनीनं तिच्या आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध कसं लग्न केलं आणि त्यावेळी पद्मिनीला दागिने देऊन कशी मदत केली, हे सांगितलं. पद्मिनी म्हणाली, की मला वाटतं पूनम खूप उदार आहे. मैत्रीसाठी तिनं खूप काही केलं. आई आणि वडील माझ्या लग्नाच्या विरोधात असताना माझ्यासाठी तिनं खूप काही केलं, मला मदत केली.

‘मैत्री निवडण्याचा अधिकार आपला’ पूनम म्हणाली, की सोप्या शब्दात सांगायचं, तर पद्मिनीनं पळून जाऊन लग्न केलं होतं. तिनं जे काही दागिने घातले होते ते आम्ही तिला दिले होते. आम्ही खूप लहान होतो आणि आम्हाला माहीत नव्हतं, की ती तिच्या लग्नात काय घालणार आहे. म्हणून आम्ही तिच्यासाठी कपड्यांची व्यवस्था केली. आम्ही अनेक चढ-उतार, आनंदाचे आणि दुःखाचे क्षण पाहिले आहेत. मला वाटतं देव कुटुंब देतो. पण मैत्री आपण निवडतो आणि या मैत्रीसाठी आम्ही काहीही करू शकतो.

Video : सोनाली कुलकर्णीनं सांगितला ‘त्या’ इंटिमेट सीनचा किस्सा अन् रवीनं लपवला चेहरा

VIDEO : ‘जर्सी’साठी शाहिद कपूरनं गाळलं रक्त आणि घाम! टाके पडल्यानंतरही जोरदार फटकेबाजी!!

Bigg Boss Season 15 : आता तर हद्द झाली..! अभिजित बिचुकलेच्या ‘या’ प्रतापानंतर सलमान खान घेणार क्लास

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.