Happy Birthday Rakhi Sawant | अवघ्या 50 रुपयांसाठी राखी सावंतने अंबानींच्या लग्नात वाढपी म्हणून काम केले, वाचा ड्रामा क्वीनच्या संघर्षाची कहाणी…
बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत (Rakhi Sawant) प्रत्येक मुद्द्यावर आपले बेधडक मत मांडत असते. प्रत्येक गोष्टीत स्वतःचा वेगळा दृष्टिकोन असलेली राखी सध्या बॉलिवूडपासून काहीशी दूर आहे. आज (25 नोव्हेंबर) राखीचा वाढदिवस आहे.
मुंबई : बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत (Rakhi Sawant) प्रत्येक मुद्द्यावर आपले बेधडक मत मांडत असते. प्रत्येक गोष्टीत स्वतःचा वेगळा दृष्टिकोन असलेली राखी सध्या बॉलिवूडपासून काहीशी दूर आहे. आज (25 नोव्हेंबर) राखीचा वाढदिवस आहे. ती तिचा 43वा वाढदिवस साजरा करत आहे. राखी सावंतचे खरे नाव नीरू भेडा आहे. इंडस्ट्रीत आल्यानंतर तिने तिचे नाव बदलून राखी सावंत ठेवले.
‘अग्निचक्र’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या राखीने बॉलिवूडमध्ये अनेक हिट आयटम साँग दिली आहेत. मात्र, हे स्थान मिळवण्यासाठी राखीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आत बिनधास्त आणि बोल्ड असणाऱ्या राखीचे बालपण मात्र अतिशय त्रासदायक आणि भीतीपूर्ण वातवरणात गेले आहे. वयाच्या 10व्या वर्षी अवघ्या 50 रुपयांसाठी तिने टीना अंबानी यांच्या लग्नात लोकांना जेवण वाढले होते आणि आज राखी सावंत मुंबईतील प्रतिष्ठित भागात एका आलिशान बंगल्यात राहते.
दोन वेळच्या अन्नाचीही भ्रांत
वयाच्या 11व्या वर्षी जेव्हा राखीने दांडिया खेळण्याचा आग्रह धरला तेव्हा तिच्या आई आणि मामा यांनी मिळून तिचे लांबसडक केस कापून टाकले. तिचे केस अशा प्रकारे कापले होते की, ते पाहताना जळल्यासारखे वाटत होते. या सर्व गोष्टी राखीने एका मुलाखतीदरम्यान सांगितल्या होत्या. गरीब कुटुंबातली राखी आज स्वतःच्या मेहनतीने इथवर पोहोचली आहे.
एका मुलाखतीत राखीने सांगितले होते की, तिचे कुटुंब खूप गरीब होते. तिची आई हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून काम करत होती आणि वडील मुंबई पोलिसांत कॉन्स्टेबल होते. त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे देखील खूप कठीण होते. कधी कधी असे व्हायचे की, त्यांच्याकडे खायला अन्नही नसायचे. शेजारी त्यांना उरलेले अन्न द्यायचे.
मनोरंजन विश्वात येण्यासाठी घरातून पैसे चोरले!
फिल्म इंडस्ट्रीत येण्यासाठी राखीने घरातून पैसे चोरले आणि पळून गेली होती. कारण, तिच्या आई-वडिलांची इच्छा होती की, तिने लवकर लग्न करावे. त्यावेळी तिला अभिनयातलं काहीच कळत नव्हतं. राखीने एका मुलाखतीत म्हणाली होती की, जेव्हा ती मुंबईला पोहोचली तेव्हा, अनेक निर्मात्यांसमोर नृत्य सादर करत होती आणि स्वतःचे टॅलेंट दाखवत होती. मात्र, त्यवेळी सर्वानीच तिच्याकडे वाईट नजरेने पाहिले.
अन् नीरु भेडाची राखी सावंत झाली!
राखीला तिच्या दिसण्यामुळे अनेक वेळा नकाराचा सामना करावा लागला आणि आपलं रूपडं बदलण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या अनुभवाबद्दल सांगताना राखी म्हणाली की, ‘मी नीरू भेडा म्हणून ऑपरेशन थिएटरमध्ये गेले होते, परंतु तिथून बाहेर पडताना राखी सावंत म्हणून बाहेर पडले.’
‘आयटम गर्ल’ म्हणून प्रसिद्ध
यानंतर राखीला ‘जोरू का गुलाम’, ‘जिस देश में गंगा रहा है’, ‘ये रास्ते में’ अशा काही चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली. परंतु, तिला 2005 साली आलेल्या ‘परदेसिया’ या गाण्याने खरी ओळख मिळाली. या गाण्यानंतर राखी सावंत ‘आयटम गर्ल’ म्हणून प्रसिद्ध झाली.
स्वयंवरही आले होते चर्चेत!
राखी सावंतनेही रिअॅलिटी शोच्या दुनियेत ‘राखी का स्वयंवर’ नावाचा एक रिअॅलिटी शो केला होता. 2009 मध्ये सुरू झालेल्या या शोमध्ये राखीने टोरंटोमधील एका स्पर्धकासोबत लग्नही केले होते. पण, काही महिन्यांनंतर त्यांनी वेगळे होण्याची घोषणा केली होती. सध्या राखी तिच्या नव्या व्हिडीओंमुळे सतत चर्चेत असते.
हेही वाचा :
कपिल शर्मा शोच्या सेटवर स्मृती इराणींना ‘नो एंट्री’! पाहा नेमकं काय घडलं?
चॉपरमधून सुष्मिता सेनची जबरदस्त एंट्री, ‘आर्या सीझन 2’चे मोशन पोस्टर पाहिले का?