Hruta Durgule: हृता दुर्गुळेनं सोडली ‘मन उडु उडु झालं’ मालिका; समोर आलं कारण

हृताने (Hruta Durgule) मालिका सोडली असली तरी 'दादा एक गुड न्यूज आहे' हे तिचं नाटकसुद्धा नाट्यरसिकांच्या भेटीला येतंय. त्याचसोबत तिचा 'अनन्या' हा चित्रपटसुद्धा प्रदर्शनासाठी सज्ज आहे.

Hruta Durgule: हृता दुर्गुळेनं सोडली 'मन उडु उडु झालं' मालिका; समोर आलं कारण
Hruta DurguleImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 01, 2022 | 12:27 PM

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील ‘मन उडु उडु झालं’ (Mann Udu Udu Zala) या लोकप्रिय मालिकेतील दिपू म्हणजेच अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) ही तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. तिच्या या व्यक्तिरेखेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. दिपू ही प्रेक्षकांना आपल्यातलीच एक वाटते, त्यामुळे प्रेक्षकांकडून हृताला या व्यक्तिरेखेसाठी सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. मात्र आता हृताच्या आणि या मालिकेच्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी समोर येतोय. हृता ही मालिका सोडत असल्याचं कळतंय. काही दिवसांपूर्वी मालिकेच्या निर्मात्यांशी तिचा वाद झाला. या वादानंतर आता हृताने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. त्यामुळे आता मालिकेत हृताची जागा कोणती अभिनेत्री घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘ई टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, सेटवरील स्वच्छतेच्या मुद्द्यावरून हृताचं निर्मात्यांशी भांडण झालं. या भांडणानंतर हृताने मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. हृता करारबद्ध असल्याने ती एक महिन्याच्या नोटीस पीरिअडवर काम करणार असल्याचं कळतंय. दुसरीकडे हृताच्या लग्नाचीही जोरदार तयारी सुरू आहे. दिग्दर्शक प्रतीक शाहशी ती लग्नगाठ बांधणार आहे. या दोघांनी साखरपुडा केला असून लवकरच ते आयुष्याच्या नव्या प्रवासाची सुरुवात करणार आहेत. हृताने मालिका सोडली असली तरी ‘दादा एक गुड न्यूज आहे’ हे तिचं नाटकसुद्धा नाट्यरसिकांच्या भेटीला येतंय. त्याचसोबत तिचा ‘अनन्या’ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शनासाठी सज्ज आहे.

हे सुद्धा वाचा

पहा फोटो-

View this post on Instagram

A post shared by Hruta Durgule (@hruta12)

मालिकेतील दिपू या भूमिकेविषयी हृता एका मुलाखतीत म्हणाली होती, “या व्यक्तिरेखेच्या लोकप्रियतेचं श्रेय पडद्यामागच्या सूत्रधारांना जातं. मी खरंतर ती व्यक्तिरेखा म्हणून फक्त दिसते पण हे प्रत्येक पात्र उभं करण्यात लेखकाचा आणि दिग्दर्शकाचा मोठा वाटा असतो. मला मंदार देवस्थळीसारखे चांगले दिग्दर्शक मिळाले, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. हृता आणि दिपूमध्ये एकच साम्य आहे ते म्हणजे चेहरा. दिपू जेवढी भित्री आहे तेवढी हृता नक्कीच नाहीये. दिपू ज्या वातावरणात लहानाची मोठी झाली ते मी अनुभवलं नाहीये आणि तिच ही भूमिका करण्यामागची खरी मज्जा आहे.”

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.