India Idol 12 | असं काय झालं की, अरुणिता पवनदीपवर रागावली! जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

सोनी टीव्हीचा रियॅलिटी शो ‘इंडियन आयडॉल’ सीझन 12ची (Indian Idol 12 ) प्रसिद्ध जोडी अरुणिता कांजिलाल (Arunita Kanjilal) आणि पवनदीप राजन (Pawandeep Rajan) आपल्या गायनातून दर आठवड्याला प्रेक्षकांची मने जिंकत असतात. हे असे दोन स्पर्धक आहेत, ज्यांना प्रेक्षकांनी अद्याप ट्रोल केलेले नाही.

India Idol 12 | असं काय झालं की, अरुणिता पवनदीपवर रागावली! जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
पवनदीप-अरुणिता
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 11:57 AM

मुंबई : सोनी टीव्हीचा रियॅलिटी शो ‘इंडियन आयडॉल’ सीझन 12ची (Indian Idol 12 ) प्रसिद्ध जोडी अरुणिता कांजिलाल (Arunita Kanjilal) आणि पवनदीप राजन (Pawandeep Rajan) आपल्या गायनातून दर आठवड्याला प्रेक्षकांची मने जिंकत असतात. हे असे दोन स्पर्धक आहेत, ज्यांना प्रेक्षकांनी अद्याप ट्रोल केलेले नाही. पण, नुकतीच म्युझिक परिफेक्शनिस्ट पवनदीप राजन याला अरुणिता कांजिलालकडून खडे बोल ऐकावे लागले आहेत (Indian Idol 12 Arunita Kanjilal scolds Pawandeep Rajan know the reason).

वास्तविक, पवनदीप आपल्या मोकळ्या वेळात काहीतरी नवीन गोष्टी शिकत राहतो. पवनदीपला संगीताचे सखोल ज्ञान आहे, परंतु आता त्याने आपल्या मोकळ्या वेळेत नवीन भाषा शिकण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या तो बंगाली भाषा शिकत आहे आणि म्हणूनच स्पर्धक अरुणिता कांजिलाल त्यांची शिक्षक झाली आहे.

पवनदीप बंगाली भाषा शिकण्यासाठी आपली मैत्रीण अरुणिताची मदत घेत आहे. स्वत: बंगाली असलेल्या अरुणिताला ही भाषा पवनदीपला शिकवताना खूप आनंद होतो. या दरम्यान, ती कधीकधी शिक्षक म्हणून पवनदीपला फटकारते देखील. फक्त पवनदीप आणि अरुणिताच नव्हे, तर सर्व स्पर्धकांमधील मैत्रीचे अविरत बंधन आहे आणि ते दररोज एकमेकांकडून काहीतरी शिकत असतात.

लवकरच बंगाली गाणे गाणार!

बंगाली भाषेच्या शिकवण्याची तयारी केलेला इंडियन आयडॉल 12चा स्पर्धक पवनदीप राजन म्हणाला की, “मला बंगाली भाषेबद्दल मोठा आदर आहे. ही भाषा शिकण्याचे माझे स्वप्न होते. जेव्हा मी अरुणिताला रिक्त वेळेत मला ही भाषा शिकवण्याची विनंती केली, तेव्हा तिने लगेचच मान्य केले. माझी सर्वात चांगली मैत्रीण आता माझी बंगाली शिक्षक आहे, हे पाहून मला खूप आनंद झाला. आहे.” इंडियन आयडॉलच्या आगामी भागामध्ये पवनदीप बंगाली भाषेत गाणे गाताना दिसू शकतो.

पवनदीपने केली मदत

याबद्दल बोलताना, पवनदीपची शिक्षिका बनलेली अरुणिता कांजिलाल म्हणते, “पवनदीप पहिल्या दिवसापासून माझा गुरू आहे, ज्याने संगीत आणि वाद्यांशी संबंधित माझ्या सर्व समस्यांचे निराकरण केले. मग जेव्हा त्याने बंगाली भाषा शिकण्याचे ठरवले आणि मला ते शिकवायला सांगितले तेव्हा मी नकार कसा देऊ? आतापर्यंत त्याला शिकवताना खूप मजा आली आहे आणि मी त्यांना शक्य तितक्या चांगल्या प्रकारे ही भाषा शिकवण्याचा प्रयत्न करत आहे.’

(Indian Idol 12 Arunita Kanjilal scolds Pawandeep Rajan know the reason)

हेही वाचा :

Anushka Sen | अभिनेत्री अनुष्का सेनला कोरोनाची लागण, ‘खतरों के खिलाड़ी’वर स्थगितीचे सावट!

PHOTO | ‘सारेगमप लिटील चॅम्प’ फेम गायक रोहित राऊत प्रेमात, पाहा कोण आहे ‘ही’ खास व्यक्ती…

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.