Indian Idol 12 Grand Finale Highlights : पवनदीप राजनने बाजी मारली, ठरला 12 व्या सिझनचा इंडियन आयडॉल
ndian Idol 12 च्या बाराव्या सिझनचा विनर शेवटी जाहीर करण्यात आलाय. Indian Idol 12 व्या सिझनची ट्रॅफी पवनदीप राजनने जिंगली आहे. या यशामुळे संपूर्ण भारतातील गीत-संगीत रसिक पवनदीप राजनचे अभिनंदन करत आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पवनदीप राजनला ही खास भेट मिळाली आहे.
Indian Idol 12 च्या बाराव्या सिझनचा विनर शेवटी जाहीर करण्यात आलाय. Indian Idol 12 व्या सिझनची ट्रॅफी पवनदीप राजनने जिंगली आहे. या यशामुळे संपूर्ण भारतातील गीत-संगीत रसिक पवनदीप राजनचे अभिनंदन करत आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पवनदीप राजनला ही खास भेट मिळाली आहे.
या शोचे जज सोनू कक्कर, अनु मलिक आणि हिमेश रेशमिया यांच्या व्यतिरिक्त, आज चित्रपट जगतातील अनेक सेलिब्रिटी या शोमध्ये सामील झाले होते. यामधी जावेद अली, मनोज मुंटाशीर, उदित नारायण आणि कुमार सानू सारखे अनेक दिग्गजांचा समावेश होता . इंडियन आयडॉल 12 च्या सहा स्पर्धकांमध्ये ही एक कठीण स्पर्धा होती. यामध्ये पवनदीपने बाजी मारली.
LIVE NEWS & UPDATES
-
पवनदीप राजनने बाजी मारली, ठरला 12 व्या सिझनचा इंडियन आयडॉल
पवनदीप राजनने बाजी मारली, ठरला 12 व्या सिझनचा इंडियन आयडॉल
25 लाख रुपये तसेच ट्रॉफीच्या स्वरुपात पवनदीपचा सन्मान
पाच स्पर्धकांवर मात करत पवनदीप ठरला इंडियन आयडॉल
-
काही क्षणांत ठरणार बाराव्या सिझनचा Indian Idol
काही क्षणांत ठरणार बाराव्या सिझनचा Indian Idol
समस्त भारतवासीयांची प्रतिक्षा संपणार
-
-
पवनदीपचं रॉकिंग परफॉरमन्स, सोनू कक्कर म्हणते ट्रॉफी तूच जिंकून घेऊन जावंस
पवनदीप राजने नेहमीप्रमाणे अतिशय उच्च दर्जाचा परफॉर्मन्स दिला. पवनदीपच्या या सादरीकरणानंतर सोनी कक्कर यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. तू ही ट्रॉफी जिंकून घेऊन जावीस असं मला मनापासून वाटतं, असं सोनू कक्करने म्हटलंय.
-
द ग्रेट खलीची Indian Idol 12 Grand Finale मध्ये पाहुणा म्हणून एन्ट्री, दानिशचा गळा पकडून दिला धक्का
द ग्रेट खली Indian Idol 12 Grand Finale मध्ये पाहुणा म्हणून आला आहे. त्याने दानिश चा गळा पकडून त्याला धक्का दिलाय. तर दुसरीकडे दानिशच्या अतिशय जबरदस्त सादरिकरणामुळे सगळेच त्याच्यावर प्रभावित झाले आहे. परिक्षकांसह प्रेक्षकांनी त्यांच्या आसनावरुन उठून दानिश गाणे म्हणत असताना डान्स केला.
-
मराठमोळ्या सायलीचा धमाकेदार परफॉरमन्स, प्रेक्षक मंत्रमुग्ध
मराठमोळ्या सायलीने Indian Idol 12 Grand Finale मध्ये धमाकेदार परफॉरमन्स दिलाय. तिच्या परफॉरमन्सने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले आहेत. महाराष्ट्राची छलक तिच्या सादरिकरणात दिसत होती.
-
-
स्टेजवर भारती सिंहची एन्ट्री, खास अंदाजात करतेय प्रेक्षकांचं मनोरंजन
Indian Idol 12 Grand Finale च्या स्टेजवर भारती सिंहची एन्ट्री.
अनोख्या अंदाजात केलं प्रेक्षकांचं मनोरंजन
भारती सिंह स्टेजवर येताच प्रेक्षक हसून लोटपोट
-
वडील उदित नारायणसमोर आदित्यचं अलका याज्ञिक यांच्याशी फ्लर्टिंग
आदित्य नारायणने केलं अलका याज्ञिक यांच्याशी फ्लर्ट केलं आहे. विशेष म्हणजे वडील उदित नारायण समोर असूनदेखील आदित्यने फ्लर्टिंग केलंय. मी कधीपासून अलका यांनी प्रभावित करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र, तसं काहीच होत नाही. मात्र, यावेळी मी अलका यांच्याकडून आय लव्ह यू हे म्हणवून घेणारच आहे, अशा शब्दात आदित्यने अलका यांच्याशी फ्लर्टिंग केलंय. कार्यक्रमादरम्यान आदित्य धम्मल-मस्ती करतोय.
-
अलका याज्ञिक यांनी गायले लता मंगेशकर यांचे गाणे, केलं खास ट्रिब्यूट
अलका याज्ञिक यांनी लता मंगेशकर यांनी गायलेले हीट गाणे इंडियन आयडॉलच्या कार्यक्रमात गायले. अलका त्यांनी गायलेले हे सर्व गाणे लता मंगेशकर यांना समर्पित केले.
-
दानिशला हवा आहे आदित्य नारायणचा जॉब, इंडियन आयडॉल होस्ट करण्याची आहे इच्छा
आदित्य नारायण अनेक वर्षांपासून हा शो होस्ट करतोय. मात्र, या हंगामाच्या सुरुवातीपासूनच दानिशला हे काम करायचं आहे. दानिशला हा शो होस्ट करावा अशी इच्छा आहे.
-
माजी स्पर्धकांनी अनु मलिकसोबत दिले परफॉर्मन्स
या शोच्या माजी स्पर्धकांनी एकापाठोपाठ एक परफॉर्मन्स दिले. प्रत्येकानं अनु मलिकसोबतही परफॉर्मन्स दिले. प्रत्येकजण गात असताना, अनु मलिक पियानो वाजवत होते. सगळेच कलाकार धमाल करताना दिसले
-
सुखविंदर आला दानिशसोबत परफॉर्म करण्यासाठी
सुखविंदर सिंह पुन्हा दानिशसोबत परफॉर्म करण्यासाठी आले. दोघांनी लगन लागी हे गाणे गायले. या दरम्यान, दानिशने सुखविंदरच्या ऊर्जेला पूर्ण स्पर्धा दिली.
-
हिमेशचा निहालसोबत जबरदस्त परफॉर्मन्स
हिमेश रेशमिया निहालसोबत परफॉर्म दिला. हिमेशनं सर्वप्रथम चलाओं ना नॅनो से बाण रें हे गाणं गायलं. तर निहालनं तेरा चेहरा हे गाणं गायलं.
-
पवनदीप राजन आणि अल्का यांची जुगलबंदी
अल्का याग्निक आणि पवनदीप राजन यांनी एकत्र परफॉर्मन्स दिला. दोघांनी ‘राहों में उनसे मुलाकात हो गई’ हे गाणं गायलं. दोघांच्या परफॉर्मन्सनं सर्वांची मने जिंकली.
-
इंडियन आयडॉल 5 चे विजेते श्रीरामचंद्र यांची उपस्थिती
इंडियन आयडॉल 5 चे विजेते श्रीराम यांनी हजेरी लावली आणि शोमधील स्पर्धकापासून गायकापर्यंतच्या त्यांच्या प्रवासाबद्दल सांगितले. श्रीराम यांनी आतापर्यंत 500 हून अधिक गाणी गायली आहेत.
Welcome @Sreeram_singer, thank you for gracing our stage! Keep watching #IndianIdol2020 #AdityaNarayan #HimeshReshammiya @fremantle_india @The_AnuMalik @SonuKakkar #GreatestFinaleEver
— sonytv (@SonyTV) August 15, 2021
-
अंताक्षरी संपली, अनु मलिकच्या टीमनं मारली बाजी
अंताक्षरीचा खेळ संपला आहे आणि अनु मलिकच्या संघानं ही स्पर्धा जिंकली. त्यांच्या संघाला विजयावर विशेष भेटवस्तू सुद्धा मिळाली.
Dhamakedar antakshari jeetkar @The_AnuMalik ki team ‘chaukaane’ ne sabko chaunka diya! RT if you enjoyed this game and keep watching #IndianIdol2020 #AdityaNarayan #HimeshReshammiya @fremantle_india @SonuKakkar #GreatestFinaleEver @NihalTauro #IdolSayli @ShanmukhapriyaO pic.twitter.com/3yscXmwRAb
— sonytv (@SonyTV) August 15, 2021
-
अनु मलिकच्या अंताक्षरी स्पर्धेने केलं सर्वांचं मनोरंजन
हिमेश रेशमियाचा संघ अंताक्षरी स्पर्धेत पराभूत होत असताना, सोनू कक्करचा संघ जिंकत आहे. या दरम्यान हिमेश आणि अनु मलिक खूप मस्ती करत आहेत.
-
हिमेश, अनु आणि सोनू यांच्या संघांमध्ये झाली अंताक्षरीची स्पर्धा
अनु कपूर या शोमध्ये पोहोचले आहेत. आता ते आलेत आणि अंताक्षरी स्पर्धा झाली नाही असं चालणार होणार आहे का? या दरम्यान, शोचे तिन्ही जज अनु मलिक, सोनू कक्कर आणि हिमेश रेशमिया यांनी आपआपले संघ तयार केले आणि या सर्वांमध्ये स्पर्धा सुरू झाली.
-
मिका सिंगनं सर्व स्पर्धकांसोबत दिला रॉकिंग परफॉर्मन्स
गायक मिका सिंगनं अंतिम फेरीसाठी हजेरी लावली आणि त्यानं प्रथम सर्व महिला स्पर्धकांसोबत, नंतर पुरुष स्पर्धकांसोबत परफॉर्मन्स दिले आणि शेवटी त्याने सर्वांसोबत रॉकिंग परफॉर्मन्स दिला.
-
आदित्य म्हणाला- मला वाटतं की यावेळी महिला स्पर्धकानं हा शो जिंकला पाहिजे
आदित्य नारायणने षण्मुखप्रियासोबत एक उत्तम परफॉर्मंस दिला आणि त्याआधी तो म्हणाला की, यावर्षी शोची विनर एक महिला स्पर्धक झाली पाहिजे
Published On - Aug 15,2021 3:48 PM