‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेच्या प्रोमोमधील चिमुकल्या स्वराने वेधलं लक्ष; नागपूरच्या अवनीविषयी काही खास गोष्टी

स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या 2 मे पासून सुरु होणाऱ्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tujhech Mi Geet Gaat Aahe) मालिकेच्या प्रोमोमध्ये झळकलेल्या चिमुकल्या स्वराने (Swara) सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे.

'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेच्या प्रोमोमधील चिमुकल्या स्वराने वेधलं लक्ष; नागपूरच्या अवनीविषयी काही खास गोष्टी
Avni Taywade Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 7:45 AM

स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या 2 मे पासून सुरु होणाऱ्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tujhech Mi Geet Gaat Aahe) मालिकेच्या प्रोमोमध्ये झळकलेल्या चिमुकल्या स्वराने (Swara) सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. गाण्याच्या दुनियेत हरवून जाणाऱ्या स्वराची भूमिका साकारते आहे बालकलाकार अवनी तायवाडे (Avni Taywade). अवनी मुळची नागपूरची. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड आहे. अवनीच्या आईने तिची आवड लक्षात घेऊन तिला अभिनय क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन दिलं. दोन हिंदी मालिका आणि एका मराठी सिनेमात अवनीने बालकलाकार म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. अवनीला मराठी मालिकेत काम करण्याची खूप इच्छा होती. स्टार प्रवाहच्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेसाठी अवनीने ऑडिशन दिलं आणि तिची निवडही झाली.

सेटवर अवनी सर्वांचीच लाडकी आहे. मालिकेतली आई म्हणजेच ऊर्मिला कोठारेसोबत तिची छान गट्टी जमून आलीय. आई-मुलीचे इमोशनल सीन अवनी अगदी सहजरित्या साकारते. अवनी आणि स्वरामधलं साम्य म्हणजे दोघींचाही स्वप्नपूर्तीच्या दिशेने सुरु असलेला प्रवास. या प्रवासातले चढ-उतार मालिकेत पाहायला मिळतीलच. पण चिमुकल्या स्वराच्या प्रेक्षक प्रेमात पडतील हे मात्र नक्की. ही नवी मालिका 2 मे पासून रात्री 9 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पहा अवनीचे फोटो-

View this post on Instagram

A post shared by Avni (@avni.taywade)

गाण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या चिमुकल्या स्वराची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारे तब्बल १२ वर्षांनंतर या मालिकेतून छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करणार आहे. वैदेही असं तिच्या पात्राचं नाव असून ती स्वराच्या आईची भूमिका साकारणार आहे.

हेही वाचा:

Ranbir Alia Wedding: रणबीर-आलियाच्या लग्नात असेल कडक सुरक्षाव्यवस्था; बोलावण्यात आले 200 बाऊंसर्स

रुपाली चाकणकर यांच्या मुलाचं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण; ‘या’ चित्रपटात साकारणार भूमिका

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.