‘लागीरं झालं जी’ फेम अभिनेत्यावर काळाचा घाला, पुण्यातील घाटात कार अपघातात मृत्यू

ज्ञानेश माने हे पेशाने डॉक्टर होते. मात्र अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांनी या क्षेत्रात पाऊल ठेवलं. ते मूळ पुणे जिल्ह्यातील बारामती, जरडगावचे रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे.

'लागीरं झालं जी' फेम अभिनेत्यावर काळाचा घाला, पुण्यातील घाटात कार अपघातात मृत्यू
लागिरं झालं जी फेम अभिनेते ज्ञानेश माने यांचं निधन
Follow us
| Updated on: Jan 18, 2022 | 11:58 AM

मुंबई : ‘लागीरं झालं जी’ (Lagira Zali Ji) या झी मराठी वाहिनीवर गाजलेल्या मालिकेतून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या अभिनेत्याचं निधन झालं. अभिनेते ज्ञानेश माने (Marathi TV actor Dnyanesh Mane) यांना कार अपघातात प्राण गमवावे लागले आहेत. पुण्यातील रोटी घाटातून प्रवास करताना मानेंच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. घाटातील वळणावर झालेल्या अपघातात ज्ञानेश माने बेशुद्ध झाले होते, मात्र रुग्णालयात नेईपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. ज्ञानेश माने यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांवर शोककळा पसरली आहे. ऐन उमेदीच्या काळात मानेंवर काळाने घाला घातल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

पुण्यातील रोटी घाटातून प्रवास करताना मानेंच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. अपघातानंतर ज्ञानेश माने बेशुद्धावस्थेत असल्याचं काही जणांनी पाहिलं. स्थानिकांनी ज्ञानेश यांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले, पण दुर्दैवाने ज्ञानेश यांचे प्राण वाचू शकले नाहीत. उपचार करण्यापूर्वीच मानेंनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती आहे.

बारामतीचा डॉक्टर ते मराठी अॅक्टर

ज्ञानेश माने हे पेशाने डॉक्टर होते. मात्र अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांनी या क्षेत्रात पाऊल ठेवलं. ते मूळ पुणे जिल्ह्यातील बारामती, जरडगावचे रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे.

अनेक मालिका-चित्रपटात भूमिका

लागिरं झालं जी या मालिकेत ज्ञानेश माने यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. याशिवाय सोलापूर गँगवार, काळूबाईच्या नावानं चांगभलं, अंबुज, हंबरडा, यादया यांसारख्या अनेक चित्रपटांत त्यांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या.

नितेश चव्हाणसोबतचे फोटो व्हायरल

ज्ञानेश यांनी ‘लागिरं झालं जी’ मालिकेत अज्याची भूमिका साकारणारा मुख्य अभिनेता नितीश चव्हाण याच्यासोबत लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. ज्ञानेश मानेंच्या आकस्मिक निधनाचे वृत्त आल्यानंतर नितीश चव्हाण याच्यासोबत त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्ञानेश माने यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांवर शोककळा पसरली आहे.

संबंधित बातम्या :

महाभारताचा कृष्ण स्वत:चा संसारही वाचवू शकला नाही, 12 वर्षानंतर पत्नीशी काडीमोड

शमिता शेट्टीच्या प्रयत्नांना अपयश…! कुंद्रा परिवाराची सून होणार ही मराठी अभिनेत्री, करणाच्या आई-वडिलांनी केले शिक्कामोर्तब!

धनुष आता रजनिकांतचा जावई नाही राहिला! घटस्फोटासोबत धनुषच्या संसाराविषयीच्या 7 मोठ्या गोष्टी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.