Lock Upp: सोशल मीडिया ॲपद्वारे लोकांकडून 50 लाख रुपये लुटले; प्रसिद्ध मॉडेलचा खुलासा

अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) 'लॉक अप' (Lock Upp) हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये नॉमिनेट केलेल्या स्पर्धकांना स्वत:ला बाद होण्यापासून वाचवण्यासाठी खासगी आयुष्यातील मोठं गुपित उघड करावं लागतं. याआधी निशा रावल, पायल रोहतगी यांसारख्या अभिनेत्रींनी त्यांच्या खासगी आयुष्यातील सिक्रेट्स चाहत्यांसमोर उघड केले होते.

Lock Upp: सोशल मीडिया ॲपद्वारे लोकांकडून 50 लाख रुपये लुटले; प्रसिद्ध मॉडेलचा खुलासा
Model Azma FallahImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 9:09 AM

अभिनेत्री कंगना रनौतचा (Kangana Ranaut) ‘लॉक अप’ (Lock Upp) हा शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये नॉमिनेट केलेल्या स्पर्धकांना स्वत:ला बाद होण्यापासून वाचवण्यासाठी खासगी आयुष्यातील मोठं गुपित उघड करावं लागतं. याआधी निशा रावल, पायल रोहतगी यांसारख्या अभिनेत्रींनी त्यांच्या खासगी आयुष्यातील सिक्रेट्स चाहत्यांसमोर उघड केले होते. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये मॉडेल आणि ब्युटी ब्लॉगर अझ्मा फलाहवर (Azma Fallah) हीच वेळ आली होती. एका सोशल मीडिया ॲपसाठी काम करत असताना अनेक लोकांची फसवणूक केल्याचा खुलासा यावेळी अझ्माने केला. या ॲपद्वारे अझ्मा लोकांशी मैत्री करून त्यांच्याशी चॅट करायची. हा मोठा खुलासा करत अझ्माने एलिमिनेशनपासून स्वत:ला वाचवलं.

“मी एका सोशल मीडिया ॲपसाठी काम केलं होतं. तिथे मला अनोळखी लोकांशी मैत्री करून त्यांच्याशी चॅट करायचं होतं. त्याच लोकांची मी फसवणूक केली आणि त्यांच्याकडून पैसे लुटले. जवळपास 40 ते 50 लाख रुपये मी त्या लोकांकडून लुटले. ही लोकं खूप श्रीमंत होती. त्या ॲपद्वारे ते फक्त मैत्रीच्या शोधात होते आणि त्यांच्याशी मैत्री करून चॅट करणं एवढंच माझं काम होतं. मी अनेकदा त्यांच्याशी खोटं बोलून त्यांच्याकडून पैसे घेतले. माझ्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ठीक नव्हती आणि माझ्या काकीला कॅन्सर होता. काही वेळा खोटं बोलून तर कधी खरं सांगून त्यांच्याकडून पैसे घ्यायची. कुटुंबीयांच्या उपचारासाठी मी तसं केलं”, असं तिने सांगितलं.

अझ्माची पोस्ट-

कुटुंबात फक्त एकटीच कमावती असल्याने तिला असं पाऊल उचलणं भाग होतं, असं अझ्माने यावेळी सांगितलं. “तुम्ही त्या ॲपद्वारे एकमेकांना भेटवस्तू पाठवू शकता आणि त्यात पैशांचाही पर्याय होता”, असं ती म्हणाली. अझ्माने असंही उघड केलं की तिच्या पालकांना याविषयीची माहिती होती की ती सोशल मीडियावरून पैसे कमावते, परंतु ती पैसे कसे कमावते हे त्यांना माहिती नव्हतं.

कोण आहे अझ्मा फलाह?

अझ्मा फलाहने लॉक अप या शोमध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश केला. ती एक ब्युटी ब्लॉगर, मॉडेल आणि फॅशन इन्फ्लुएन्सर आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. इंस्टाग्राम हँडलवर तिचे दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

हेही वाचा:

Hyderabad Drug Raid : मुलगी निहारिका कोनिडेलाला पबमध्ये ताब्यात घेतल्यानंतर नागा बाबूची प्रतिक्रिया

Bharti Singh: ‘मुलगा झाला!’ कॉमेडियन भारतीच्या पतीनं दिली खूशखबर, कसे आहेत बाळ-बाळंतीण?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.