Love Story | वेगवेगळा स्वभाव तरीही एकमेकांच्या प्रेमात पडले मंदिरा बेदी-राज कौशल, घरच्यांची संमती मिळताच केले लग्न!

‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ फेम मंदिरा बेदी (Mandira Bedi) आणि राज कौशल (Raj Kaushal) यांची जोडी पाहून प्रत्येकजण असे म्हणायचे की, जेव्हा दोन विरोधी व्यक्तिमत्व एकत्र येतात, तेव्हा एक परिपूर्ण जोडपे तयार होते. दोघे 1996 मध्ये प्रथमच भेटले होते.

Love Story | वेगवेगळा स्वभाव तरीही एकमेकांच्या प्रेमात पडले मंदिरा बेदी-राज कौशल, घरच्यांची संमती मिळताच केले लग्न!
मंदिरा-राज
Follow us
| Updated on: Jul 02, 2021 | 8:32 AM

मुंबई : ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ फेम मंदिरा बेदी (Mandira Bedi) आणि राज कौशल (Raj Kaushal) यांची जोडी पाहून प्रत्येकजण असे म्हणायचे की, जेव्हा दोन विरोधी व्यक्तिमत्व एकत्र येतात, तेव्हा एक परिपूर्ण जोडपे तयार होते. दोघे 1996 मध्ये प्रथमच भेटले होते. राज त्यावेळी मुकुल आनंदचे मुख्य सहाय्यक होते आणि एका शोचे ऑडिशन घेण्यात व्यस्त होते. त्यावेळी मंदिराने लोकप्रिय कार्यक्रम ‘शांती’ आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या सुपरहिट चित्रपटात काम केले होते (Love Story of Bollywood actress Mandira Bedi and Late Director Raj Kaushal).

मंदिरा बेदीचे काम राज यांनी आधीच पाहिले होते. मात्र, त्यांच्या भेटीनंतर राज यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘आम्ही नितीन मनमोहन यांच्या कार्यालयात भेटलो होतो. मी मुकुल आनंदचा मुख्य सहाय्यक होतो आणि ऑडिशन घेत होतो. ऑडिशनसाठी मंदिरालाही बोलावण्यात आले होते. त्यावेळी मी मंदिराला पहिल्यांदा पाहिले आणि तिने लाल-पांढऱ्या टी-शर्टसह खाकी पॅन्ट परिधान केली होती. दिलवाले दुल्हनिया या चित्रपटात मी मंदिराला पाहिले होते. पण तिला समोर पाहून मला ती जास्त आवडली.’

त्यानंतर राज आणि मंदिरा पुन्हा-पुन्हा भेटत राहिले आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. मंदिरा आणि राज दोघेही विरुद्ध स्वभावाचे होते. पण राज म्हणाले होते की, ‘लवकरच आपल्याला कळले की मंदिरा केवळ त्यांच्यासाठीच बनली आहे. मी मंदिराला सांगितले की, मला लग्न करायचे आहे. ती शाकाहारी होती आणि मी मांसाहारी होतो. सुरुवातीला आमच्या डेट उडुपी हॉटेल्समध्ये होत होत्या.’

का आवडला राज?

मंदिराला राजमध्ये तिला काय आवडते हे विचारले असता मंदिरा म्हणाली होती, ‘तो खूप साधा आणि प्रामाणिक आहे. त्यात काही दिखावा नाही. तो जसा आहे तसा समोर आहे.’ त्याचवेळी राज म्हणाले होते, मंदिरा ही एक अतिशय हुशार आणि सुंदर मुलगी आहे. मनोरंजन विश्वाचा एक भाग असल्याने, आयुष्य किती व्यस्त आहे हे तिला समजले. आमच्या कठीण काळातही ती नेहमीच साथ देत राहिली आहे.

मंदिराच्या पालकांना मान्य नव्हते नाते

राजला सुरुवातीपासूनच मंदिराशी लग्न करायचे होते. कोणताही वेळ न दवडता त्याने मंदिराची आपल्या पालकांशी ओळख करून दिली. राज यांच्या कुटुंबियांना या नात्यात कोणतीही अडचण नव्हती, परंतु मंदिराचे आई-वडील या लग्नाला तयार नव्हते. मंदिराच्या आई-वडिलांना भेटण्याविषयी राज म्हणाले होते की, ‘माझ्या पालकांच्या बाजूने कोणतीही अडचण नव्हती, परंतु मंदिराच्या बाजूने होती. कारण ती एका बँकर्सच्या कुटुंबातील होती. तिचे वडील एक संपूर्ण कॉर्पोरेट व्यक्तिमत्व होते. तथापि, नंतर ते देखील सहमत झाले, कारण त्यांच्याकडे देखील पर्याय नव्हता.’

त्याच वेळी मंदिरा म्हणाली होती की, ‘माझे पालक तणावात होते, कारण मी चित्रपट दिग्दर्शकाशी लग्न करण्याचा विचार करत होतो आणि हे काम खूप अस्थिर आहे. पण नंतर ते देखील राजच्या प्रेमात पडले.’

12 वर्षानंतर मुलाचा जन्म

कुटुंबाच्या संमतीनंतर दोघांनी 1999मध्ये लग्न केले. दोघांचे दोन वेगवेगळ्या पद्धतीत लग्न पार पडले होते. लग्नाच्या तब्बल 12 वर्षानंतर दोघे एका मुलाचे पालक झाले. वास्तविक, दोघांनीही त्यांच्या कामाच्या वचनबद्धतेमुळे त्यांनी बाळाचे नियोजन उशीराच केले. यानंतर राज आणि मंदिराने सन 2020मध्ये एका मुलीला दत्तक घेतले.

मंदिरा आणि राज यांच्या नात्याबद्दल खास गोष्ट म्हणजे दोघेही नेहमीच एकमेकांसमोर पारदर्शक होते. स्वभाव-संस्कृती वेगळी असली तरी, परंतु दोघांमध्ये समान उत्कटता आणि प्रेम होते. तथापि, नियतीला देखील या सुखी संसाराचा हेवा वाटला असावा. राज यांच्या जाण्याने या सुखी कुटुंबाचा आधार हिरावला गेला. मात्र, राज मंदिराच्या हृदयात नेहमीच जिवंत राहील!

(Love Story of Bollywood actress Mandira Bedi and Late Director Raj Kaushal)

हेही वाचा :

PHOTO | छोट्या पडद्यापासून फिल्मी विश्वापर्यंतचा प्रवास, असे होते मंदिरा बेदीचे करिअर!

Mandira Bedi | पतीच्या निधनामुळे कोसळला दुःखाचा डोंगर, मैत्रीण मौनी रॉयने घेतली मंदिराची भेट!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.