‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ सुवर्णदशक सोहळयात महेश मांजरेकरांची चौकार षटकाराची आतीषबाजी!

झी टॅाकीजचा 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' (Maharashtracha favorite kon) सुवर्णदशक पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. मागील दहा वर्षांमधील कलाकारांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या सुवर्णदशक सोहळ्यातही सूत्रसंचालन हा मुद्दा लाइमलाईटमध्ये राहिला.. मांजरेकरांनी आपल्या नेहमीच्याच शैलीत जोरदार फटकेबाजी करत सोहळयात रंगत आणली.

'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' सुवर्णदशक सोहळयात महेश मांजरेकरांची चौकार षटकाराची आतीषबाजी!
Mahesh manjrekar
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 8:00 AM

मुंबई : झी टॅाकीजचा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ (Maharashtracha favorite kon) सुवर्णदशक पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. मागील दहा वर्षांमधील कलाकारांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या सुवर्णदशक सोहळ्यातही सूत्रसंचालन हा मुद्दा लाइमलाईटमध्ये राहिला.. मांजरेकरांनी आपल्या नेहमीच्याच शैलीत जोरदार फटकेबाजी करत सोहळयात रंगत आणली.

शाब्दिक फटकेबाजी करण्याची महेश मांजरेकरांची कला ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ सुवर्णदशक सोहळयामध्ये पुन्हा एकदा पहायला मिळाली. पहिला तडाखा अर्थातच स्वप्नील-अमेय जोडीलाच बसला. ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ सुवर्णदशक सोहळयाचं सूत्रसंचालन करताना एकमेकांवर कुरघोडी करू पाहणाऱ्या दोघांची ‘तू तू मैं मैं’ सुरू असताना प्रेक्षकांमधून मांजरेकरांचा आवाज आला आणि दोघंही काही क्षणासाठी अवाक झाले त्यानंतर महेश मांजरेकरांच्या विंनतीला मान देत ते जे बोलतील ते दोघांनीही मान्य केलं.

सूत्रसंचालनाचा लगाम मांजरेकरांच्या हाती!

त्यानंतर काही वेळ मांजरेकरांनी स्वत: मुख्य सूत्रसंचालनाचा लगाम स्वत:च्या हाती घेतला. यात त्यांनी वार्षिक बुलेटीन सादर केलंच, पण त्यासोबतच ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ या पहिल्या पुरस्कार सोहळयापासूनच्या जुन्या आठवणींनाही सुखद उजाळा दिला. जुन्या व्हिडिओज मार्फ़त आठवणींचा पट याप्रसंगी उलगडला. चित्रपटसृष्टीतील कलाकार मंडळींची थट्टामस्करी आणि कौतुक करतानाच महेशसरांनी विनोदाच्या चौकार षटकाराची मनमुराद बॅटिंग केली. प्रसंगी कोणी दुखावलं गेलं असेल तर त्या कलाकारांप्रती महेशसरांनी दिलगीरी व्यक्त करत मनाचा मोठेपणा ही दाखवला.

पुरस्कार सोहळ्यात भरले रंग!

चित्रपटसृष्टीतील कोणतीच गोष्ट महेश मांजरेकरांपासून लपून राहत नाही. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रत्येकाची इत्थंभूत माहिती त्यांच्याकड़े असते. वार्षिक बुलेटीनमध्ये पुन्हा एकदा कलाकार, गायक, संगीतकारांचा यथेच्छ समाचार घेत मांजरेकरांनी आपल्या अनोख्या शैलीत ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ सुवर्णदशक सोहळयामध्ये रंग भरले. मंचावर हे सर्व सुरू असताना समोर बसलेले सिनेसृष्टीतील दिग्गज मनसोक्त आनंद घेत होते आणि स्वत:ची थट्टा-मस्करी केली जाऊनही त्याचा मनमुराद आनंदही लुटत होते.

हा पुरस्कार सोहळा महेश मांजरेकरांच्या खुमासदार निवेदनाने अधिक रंगतदार होतो. यंदाही हा सोहळा अनेक आकर्षक कलाविष्कारांनी चांगलाच रंगला. ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ सुवर्णदशक सोहळा रविवार 26 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजता झी टॅाकीजवर प्रसारित होणार आहे.

हेही वाचा :

Happy Birthday Ravi Dubey | मालिकेच्या सेटवर भेट झाली अन् अभिनेत्रीच्या प्रेमातच पडला! वाचा रवी दुबेची लव्हस्टोरी…

Ganapath | अरे देवा! टायगरच्या डोळ्याला काय झालं? ‘गणपत’च्या चित्रिकरणादरम्यान टायगर श्रॉफ जखमी!

चाहत्याच्या लग्नात चक्क सेलिब्रिटींची एण्ट्री, ‘ओम आणि स्वीटू’ जोडीने विवाह सोहळ्याचा आनंद दुणावला!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.