अभिज्ञा भावेच्या पतीला कॅन्सर; रुग्णालयातील फोटो आला समोर
(Mehul Pai) मेहुलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रुग्णालयातील फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का!

‘रंग माझा वेगळा’, ‘खुलता कळी खुलेना’, ‘तुला पाहते रे’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya bhave) गेल्या वर्षी लग्नबंधनात अडकली. मेहुल पै (Mehul Pai) याच्याशी तिने लग्न केलं. मेहुल हा एका इव्हेंट कंपनीचा मालक आहे. कॉलेजमध्ये हे दोघं पहिल्यांदा एका कार्यक्रमानिमित्त भेटले. लग्नापूर्वी जवळपास पंधरा वर्षांची या दोघांची ओळख होती. सध्या मेहुलच्या सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे या दोघांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मेहुलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रुग्णालयातील फोटो पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने कॅन्सरशी (Cancer) झुंज देत असल्याचं स्पष्ट केलं आहे. या फोटोमध्ये त्याच्यासोबत अभिज्ञासुद्धा पहायला मिळतेय. मेहुलची ही पोस्ट पाहून अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे तो लवकराच लवकर बरा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.
काय आहे मेहुलची पोस्ट? ‘माझ्या आयुष्यात मला अनेक मूर्ख भेटले, परंतु कर्करोग हा त्यापैकी सर्वांत मोठा आहे. मला माफ कर, पण तू चुकीच्या व्यक्तीला निवडलंस’, असं लिहित मेहुलने रुग्णालयातील फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत तो लवकरात लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना केली आहे. अभिज्ञाची सर्वांत खास मैत्रीण मयुरी देशमुख हिनंसुद्धा कमेंट करत अभिज्ञा आणि मेहुलला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘तू रॉकस्टार आहेत. ही लढाई तू नक्की जिंकणार’, असं तिनं लिहिलं आहे. ऋतुजा बागवे, अक्षया देवधर यांसारख्या कलाकारांनीही कमेंट केल्या आहेत.
View this post on Instagram

Abhidnya Bhave and Mehul Pai
अभिज्ञा आणि मेहुलचं हे दुसरं लग्न आहे. २०१४ मध्ये अभिज्ञाने वरुण वैतीकरशी लग्न केलं होतं. पण या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. युथ फॅशन आयकॉन म्हणून अभिज्ञा ओळखली जाते. अभिनयक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी ती एअरहोस्टेस म्हणून काम करत होती. अभिज्ञाने तेजस्विनी पंडितसोबत मिळून ‘तेजाज्ञा’ हा फॅशन ब्रँड लाँच केला आहे. अल्पावधीतच हा ब्रँड सेलिब्रिटी आणि सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय झाला आहे.
संबंधित बातम्या: ‘मेमोरिज ब्रिंग बॅक’, अभिनेत्री अभिज्ञा भावेनं शेअर केले लग्नाचे फोटो
संबंधित बातम्या: ‘हर घडी बदल रहीं है रुप जिंदगी’, अभिनेत्री अभिज्ञा भावेचा रेट्रो अंदाज