Nagarjuna Akkineni | ‘बिग बॉस तेलुगु’च्या घराची धुरा ‘मास’च्या हाती, पाहा एका भागासाठी किती मानधन आकारतो नागार्जुन अक्किनेनी

तेलुगूच्या ‘बिग बॉस सीझन 5’ला (Bigg Boss Telugu season 5) चांगली सुरुवात झाली आहे. हा सीझन स्टार मा वाहिनीवर आजपासून म्हणजेच सोमवारपासून (6 सप्टेंबर) प्रसारित केला जाईल. हिंदी बिग बॉस प्रमाणे, शोचे होस्ट आणि ज्येष्ठ अभिनेते नागार्जुन अक्किनेनी (Nagarjuna Akkineni) विकेंडला शोमध्ये एक उत्तम तडका लावणार आहेत.

Nagarjuna Akkineni | ‘बिग बॉस तेलुगु’च्या घराची धुरा ‘मास’च्या हाती, पाहा एका भागासाठी किती मानधन आकारतो नागार्जुन अक्किनेनी
नागार्जुन अक्किनेनी
Follow us
| Updated on: Sep 06, 2021 | 1:54 PM

मुंबई : तेलुगूच्या ‘बिग बॉस सीझन 5’ला (Bigg Boss Telugu season 5) चांगली सुरुवात झाली आहे. हा सीझन स्टार मा वाहिनीवर आजपासून म्हणजेच सोमवारपासून (6 सप्टेंबर) प्रसारित केला जाईल. हिंदी बिग बॉस प्रमाणे, शोचे होस्ट आणि ज्येष्ठ अभिनेते नागार्जुन अक्किनेनी (Nagarjuna Akkineni) विकेंडला शोमध्ये एक उत्तम तडका लावणार आहेत. टॉलीवूडचा राजा अक्किनेनी नागार्जुनने रविवारी स्टार मा वाहिनीवरील शोच्या भव्य प्रीमियरमध्ये स्टेजवर ग्रँड एंट्री घेतली. यानंतर, त्याने आपल्या सुपर स्टाईलने शो होस्ट करत बिग बॉसच्या सर्व स्पर्धकांची एक-एक करून ओळख करून दिली.

हा शो सुरू होण्यापूर्वी, बिग बॉस सीझन 5 च्या घरात कैद होणारे स्पर्धक कोण असतील, हे जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता होती. रविवारी झालेल्या भव्य प्रीमियरमध्ये शोच्या 19 स्पर्धकांची नावे उघड झाली आहेत. बिग बॉसच्या या घरात पोहोचलेल्या स्पर्धकांची आरटीपीसीआर चाचणी झाली होती आणि त्यांना मर्यादित काळासाठी अलग ठेवण्यात आले होते.

‘बिग बॉस तेलुगु 5’चे स्पर्धक

टीव्ही अँकर रवी किरणपासून गायिका श्वेतापर्यंत अनेक प्रसिद्ध लोक यावेळी बिग बॉस तेलुगु सीझन 5 चा भाग बनले आहेत. चला तर मग जाणून घेऊ कोण बिग बॉसच्या घरात कैद झाले आहे. रवी किरण आणि श्वेता व्यतिरिक्त, हे स्पर्धक शोमध्ये दिसले – आरजे काजल, अभिनेता मानस, उमादेवी, WWE विश्वा, अभिनेत्री सरयू, डान्स कोरिओग्राफर नटराज, हमीदा, यूट्यूबर शणमुख, प्रियंका, सुपरमॉडेल जैसी, टीव्ही अभिनेत्री प्रिया, अभिनेता लोबो, नृत्यदिग्दर्शक अॅनी, इंडियन आयडॉल स्पर्धक आणि गायक श्रीरामचंद्र, लाहिरी अर्बन, टीव्ही अभिनेता सनी, यूट्यूबर सिरी.

एका भागासाठी किती मानधन आकारतो नागार्जुन अक्किनेनी?

ऑनलाइन मीडिया रिपोर्टनुसार, बिग बॉसच्या या नवीन सीझनसाठी नागार्जुन अक्किनेनी तगडे मानधन घेत आहेत. नागार्जुन होस्ट करत असलेला हा सलग तिसरा हंगाम आहे. तिसऱ्या हंगामात, नागार्जुनने एका भागासाठी 12 लाख रुपये आकारले होते, जे चौथ्या हंगामात थोडे वाढले आहे. आता पाचव्या हंगामाबद्दल बोलताना, नागार्जुन यांनी त्यांचे मानधन 15 टक्क्यांनी वाढवले ​​आहे. अहवालांनुसार, शोच्या संपूर्ण हंगामासाठी नागार्जुनने सुमारे 11 ते 12 कोटी रुपये घेतले आहेत. मात्र, स्वतः अभिनेता किंवा शोच्या निर्मात्यांनी त्याच्या फीसंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

नागार्जुन या शोबद्दल खूप उत्साहित आहे. आपल्या एका वक्तव्यात ते म्हणाले होते की, मागील काही महिने प्रत्येकासाठी कठीण आणि आव्हानात्मक होते आणि या शोद्वारे सर्वोत्तम मनोरंजनासह आमच्या चाहत्यांच्या जीवनात आनंद आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. एक कलाकार म्हणून, मी स्पर्धकांच्या खऱ्या भावनांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि त्यांना समोर आणण्यासाठी उत्सुक आहे, जेणेकरून प्रेक्षक त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतील. कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे समाधान आणि मनोरंजन करणाऱ्या शोचा भाग बनल्याचा मला आनंद होत आहे.

हेही वाचा :

मराठी मनोरंजन विश्वातील ‘या’ प्रसिद्ध जोडीच्या घरी ‘गुड न्यूज’, सोशल मीडियावर शेअर केला खास फोटो!

Suyash Tilak : ‘आज हा प्रवास संपला; म्हणजे ‘बिग बॅास’मध्ये जातोय असं नाहीये’, ‘शुभमंगल ऑनलाईन’साठी सुयश टिळकची खास पोस्ट

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.