‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत समीर-शेफालीचं जुळवून देण्यासाठी ‘या’ अभिनेत्रीची होणार एण्ट्री
झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazhi Tuzhi Reshimgaath) या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतील यश आणि नेहाची (Yash & Neha) जोडी आणि परीचा निरागस अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे.
झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazhi Tuzhi Reshimgaath) या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतील यश आणि नेहाची (Yash & Neha) जोडी आणि परीचा निरागस अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. इतकंच नव्हे तर या मालिकेतील आजोबा, बंडू काका काकी, समीर, शेफाली, सिम्मी या आणि अशा इतर व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात. यश-नेहा प्रमाणेच अजून एक जोडी प्रेक्षकांना बघायला आवडते ते म्हणजे समीर आणि शेफालीची. त्या दोघांमधील नोकझोक प्रेमात कधी बदलणार याची वाट प्रेक्षक पाहत आहेत. समीर आणि शेफालीचं जुळवून देण्यासाठी आता या मालिकेत एका अभिनेत्रीची एण्ट्री होणार आहे.
शेफालीची आई मोहिनी ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना लवकरच मालिकेत पाहायला मिळणार आहे. ही व्यक्तिरेखा अभिनेत्री गौरी केंद्रे साकारणार आहेत. ही एक मजेदार भूमिका असणार आहे जे प्रेक्षकांना पाहायला आवडेल. या व्यक्तिरेखेच्या एण्ट्रीमुळे समीर आणि शेफाली यांची मैत्री प्रेमात बदलेल का हे प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळेल.
मालिकेचा प्रोमो-
View this post on Instagram
या भूमिकेबद्दल बोलताना अभिनेत्री गौरी केंद्रे म्हणाल्या, “माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं आहे. या लोकप्रिय मालिकेत एका रंजक वळणावर मोहिनी या व्यक्तिरेखेची एण्ट्री होतेय. मी मोहिनी म्हणजेच शेफालीच्या आईची भूमिका साकारतेय जे एक हसमुख व्यक्तिमत्व आहे. मोहिनीमुळे प्रेक्षकांना मालिका पाहताना मजा येईल. ही मोहिनी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल.”
हेही वाचा:
Mukta Barve: ‘पुण्यावर पुन्हा एकदा एक भयंकर संकट कोसळलंय’; अभिनेत्री मुक्ता बर्वेची पोस्ट चर्चेत
‘लग्न.. लग्न.. लग्न..’; लग्नपत्रिकेवर छापला KGF 2 मधील यशचा डायलॉग; वाचून तुम्हीही पोट धरून हसाल!