AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 14 | मास्टर माइंड ‘विकास गुप्ता’ पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात दाखल!

नुकताच बिग बॉस 14 (bigg Boss 14) चा आजचा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये विकास गुप्ता घरामध्ये प्रवेश करताना दिसत आहे.

Bigg Boss 14 | मास्टर माइंड 'विकास गुप्ता' पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात दाखल!
| Updated on: Dec 21, 2020 | 5:08 PM
Share

मुंबई : नुकताच बिग बॉस 14 (bigg Boss 14) चा आजचा प्रोमो समोर आला आहे. यामध्ये विकास गुप्ता घरामध्ये प्रवेश करताना दिसत आहे. यामुळे अर्शी खानला चांगलाच धक्का बसला आहे. विकास घरामध्ये आल्यानंतर रूबिना दिलैक मोठा आनंद झाल्याचे दिसत आहे. अर्शी विकासला चहा पिणार का हे विचारताना दिसत आहे, मात्र विकास नाही म्हणतो. यावेळी घरातील सदस्यांना विकास सांगताना दिसत आहे, माझ्या मनात एक भिती होती आणि आता ती भिती माझी गेली आहे, आणि आता ते सर्वांच्या पुढे आले आहे. (New turn Master Mind ‘Vikas Gupta’ enters Bigg Boss’s house once again)

बिग बॉसने दिलेल्या या नॉमिनेशन टास्कमध्ये आज मोठा हंगामा बघायला मिळणार आहे. बिग बॉसच्या घरातील सदस्य राहुल वैद्य, अभिनव-रुबीना, तर अभिनव शुक्ला अर्शी खान आणि राहुल वैद्य यांना लक्ष्य करताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी अर्शी खान आणि विकास गुप्ता यांच्यात भांडणे झाली होती. यावेळी अर्शी खानने विकास गुप्ता यांच्या आईवर भाष्य केले होते, त्यानंतर विकासने तिला पाण्यात ढकलले होते. अर्शीला पाण्यात ढकल्यामुळे विकास गुप्ताला बिग बॉसच्या घरातून बेघर देखील व्हावे लागले होते.

त्यानंतर सलमान खानने अर्शीचा चांगला क्लाल घेतला सलमान म्हणाला की, तु विकास गुप्ताच्या आईबद्दल बोललीस आणि कोणी माझ्या आईबद्दल असे बोलले असते तर कदाचित मी सुध्दा तेच केले असते जे विकास गुप्ताने केले. त्याचबरोबर सलमान घरातील इतर सदस्यांना विचारतो की, जर अर्शी तुमच्या आईबद्दल अशी बोलली असती तर तुम्ही काय केले असते. त्यावर राखी सावंत म्हणते की, माझ्या आईबद्दल बोलले असते तर तिचा गळा मी दाबला असता, रूबीना म्हणते की, मी तिच्या कानाखाली जाळ काढल्या असता आणि स्वत: बिग बॉसच्या घराबाहेर गेले असते.

यासर्व प्रकरणावर अर्शी म्हणाली होती की, मी विकास गुप्ताच्या आईबद्दल काहीही वाईट बोलले नाही. आणि ती मोठमोठ्याने ओरडत असते त्यावेळी तिला रागावताना दिसत आहे. अर्शी म्हणते की, आता मला बिग बॉसच्या घरात राहायचे नाही असे म्हणत ती उठून जाते. यावेळी सलमान म्हणतो की, कोणाच्याही आई-वडीलांबद्दल चुकीचे बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | ‘इम्युनिटी स्टोन’साठी ‘बिग बॉस’च्या स्पर्धकांचे आयुष्य चव्हाट्यावर, नव्या रहस्यांनी प्रेक्षक स्तब्ध!

Bigg Boss 14 |रूबीना-जास्मीनच्या मैत्रीत फूट, अभिनव आणि रूबीनामध्येही वाद बिग बॉसच्या घराचे चित्र पालटले!

(New turn Master Mind ‘Vikas Gupta’ enters Bigg Boss’s house once again)

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.