Video | ‘परी आणि तिचा लाडका बाप्पा’, रांगोळी कलाकारालाही पडलीय लहानग्या मायराची भुरळ!

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत श्रेयस आणि प्रार्थना सोबत झळकणारी चिमुकली मायरा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. मालिका सुरु होण्याआधीपासून मायरा प्रेक्षकांची लाडकी बनली होती. प्रार्थना आणि श्रेयससोबतच आता चिमुकली मायरा देखील प्रेक्षकांना भुरळ घालत आहे.

Video | ‘परी आणि तिचा लाडका बाप्पा’, रांगोळी कलाकारालाही पडलीय लहानग्या मायराची भुरळ!
Myra
Follow us
| Updated on: Sep 23, 2021 | 2:18 PM

मुंबई : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत श्रेयस आणि प्रार्थना सोबत झळकणारी चिमुकली मायरा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. मालिका सुरु होण्याआधीपासून मायरा प्रेक्षकांची लाडकी बनली होती. प्रार्थना आणि श्रेयससोबतच आता चिमुकली मायरा देखील प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे या दोन बड्या कलाकारांच्या छोट्या पडद्यावरील पुनरागमनाच्या चर्चेपेक्षाही क्युट मायरा भाव खाऊन जात आहे. मायरा वायकुळने टिकटॉक व्हिडीओजच्या माध्यमातून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. टिकटॉक स्टार म्हणून तिची ओळख होती. सध्या इन्स्टाग्रामवरही तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. सध्या तिचे 75 हजारांपेक्षा जास्त (75.3k) चाहते आहेत.

अशाच एका चाहत्याने आता चक्क मायराची रांगोळी रेखाटली होती. ही रांगोळी अक्षरशः जिवंत मायराच भासत होती. ओमकार नलावडे या रांगोळी कलाकाराने ही रांगोळी रेखाटली होती.

पाहा व्हिडीओ :

कोण आहे मायरा वायकुळ?

झी मराठी वाहिनीवर नुकत्याच सुरु झालेल्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या नवीन मालिकेच्या प्रोमोमध्ये जेमतेम चार वर्षांची एक चिमुरडी अभिनेता श्रेयस तळपदेच्या व्यक्तिरेखेसोबत लग्नाची बोलणी करताना दिसली होती. काय म्हणणं आहे? कमवतो किती? नोकरी कुठे करतो? असे प्रश्न ही चिमुरडी विचारते. त्यावर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचा हा हिरो तिच्या वयाला समाधानकारक उत्तरं देतो. त्यानंतर विचार करुन सांगते, असं निरागस उत्तर देते.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत प्रेक्षकांचं मन जिंकून घेणाऱ्या या चिमुरडीचं नाव आहे मायरा वायकुळ. श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे या दोन बड्या कलाकारांच्या छोट्या पडद्यावरील पुनरागमनाच्या चर्चेपेक्षाही क्युट मायरा भाव खाऊन जात आहे.

सोशल मीडियावर तुफान फॉलोअर्स

मायरा वायकुळने टिकटॉक व्हिडीओजच्या माध्यमातून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. टिकटॉक स्टार म्हणून तिची ओळख होती. सध्या इन्स्टाग्रामवरही तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. सध्या तिचे 75 हजारांपेक्षा जास्त (75.3k) चाहते आहेत.

युट्यूबवर Myra’s corner हे मायराचे चॅनल आहे. त्यावर तिचे आतापर्यंत 105K म्हणजे एक लाख पाच हजाराहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. या चॅनलवर मायराचे अनेक व्हिडीओ तुम्हाला पाहायला मिळतील. मायराच्या योगा सेशन, खेळण्यांपासून तिने बनवलेला केक आणि हळदी कुंकू समारंभापर्यंत अनेक व्हिडीओ दिसतात.

मायरा वायकुळ आपल्या कुटुंबासोबत मुंबईत राहते. तिची आई तिचे सोशल मीडिया अकाऊण्ट सांभाळते. फक्त मायराच नाही, तर तिची आई श्वेता वायकुळचेही हजारो फॉलोअर्स इन्स्टाग्रामवर आहेत.

हेही वाचा :

एकेकाळी संगीता बिजलानीशी लग्न करायला निघालेला सलमान खान, लग्नाच्या पत्रिका देखील छापलेल्या! वाचा पुढे काय झालं?

Bigg Boss Marathi 3 | स्नेहा वाघची दोन लग्न, दोन्ही वेळा घटस्फोट, 11 वर्षांनी लहान डान्सरसोबत डेटिंगची चर्चा!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.