‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतून प्रसिद्ध अभिनेत्रीची एग्झिट; सोशल मीडियावर लिहिली भावनिक पोस्ट

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ (Sundara Manamadhe Bharali) ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेतील ‘लतिका’, ‘अभिमन्यू’, ‘दौलत’ या व्यक्तिरेखांसोबत इतर पात्रंदेखील खूप गाजत आहेत.

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतून प्रसिद्ध अभिनेत्रीची एग्झिट; सोशल मीडियावर लिहिली भावनिक पोस्ट
Sundara Mana Madhye Bharli Image Credit source: Voot
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 1:13 PM

कलर्स मराठी वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ (Sundara Manamadhe Bharali) ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेतील ‘लतिका’, ‘अभिमन्यू’, ‘दौलत’ या व्यक्तिरेखांसोबत इतर पात्रंदेखील खूप गाजत आहेत. या मालिकेतील कलाकार सोशल मीडियावरही बरेच चर्चेत आहेत. नुकतंच एका अभिनेत्रीने या मालिकेला रामराम केला. ही अभिनेत्री म्हणजे अदिती द्रविड (Aditi Dravid). ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत अदितीने नंदिनीची भूमिका साकारली. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. मालिका सोडल्यानंतर अदितीने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे तिने चाहत्यांचे आभार मानत मालिकेतील तिचा प्रवास कसा होता, याविषयी सांगितलं आहे. (Marathi Serial) अदिती द्रविडचं क्रिकेटर राहुल द्रविडशी खास नातं आहे. राहुल द्रविड हा तिचा काका आहे.

अदिती द्रविडची पोस्ट-

‘नंदिनीचा प्रवास २७ ऑगस्टला सुरू झाला होता आणि खरंतर ती फक्त दोन महिन्यांसाठी आली होती. पण बघता बघता दोनचे सहा महिने कधी झाले कळंलच नाही आणि हे केवळ तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळेच शक्य झालं. नंदिला अधिकृतरित्या बाय-बाय म्हणायचं राहिलं होतं. म्हणून आज ही पोस्ट करतेय. नंदिनी म्हणून मी जेव्हा पहिल्यांदा तयार झाले आणि पहिल्या सीनची स्क्रिप्ट वाचली तेव्हाचे हे फोटो आहेत. तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी धन्यवाद हा शब्द खूपच छोटा आहे. मला नंदिनीची भूमिका मिळाली यासाठी मी कृतज्ञ आहे,’ अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या.

अदितीने याआधीही बऱ्याच मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत तिने शनायाची मैत्रीण ईशाची भूमिका साकारली होती. शनायाची भूमिका साकारणारी रसिका सुनील आणि अदिती यांच्यातही खूप चांगली मैत्री आहे. या दोघींनी मिळून ‘यू अँड मी’ हे व्हिडीओ साँग प्रेक्षकांच्या भेटीला आणलं होतं. याशिवाय स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महामानवाची गौरवगाथा’ या मालिकेतही अदितीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

हेही वाचा:

शिर्केपाटील कुटुंबात दाखल होणार गौरीसारखी दिसणारी नवी पाहुणी

मराठमोळ्या नागराज मंजुळेंसाठी अमिताभ बच्चन यांचा मोठा निर्णय; बिग बींचं कौतुक करावं तेवढं कमी!

“20-30 वर्षांत जे आमच्याकडून नाही झालं, ते नागराजने करून दाखवलं”; आमिर खानचे डोळे पाणावले

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.