Rakhi Sawant Husband | ‘आमचं आधीच लग्न झालंय, मग तो राखीचा नवरा कसा?’, रितेशची पहिली पत्नी स्निग्धा माध्यमांसमोर!

अलीकडेच, राखी सावंतचा (Rakhi Sawant) पती रितेश (Ritesh) ‘बिग बॉस 15’च्या (Bigg Boss 15) घरात आल्यानंतर त्याचा एक फोटो समोर आला होता, ज्यामध्ये तो एक महिला आणि मुलासोबत दिसत होता. ती रितेशची पहिली पत्नी असून, त्यांचा अद्याप घटस्फोट झाला नसल्याचा दावा केला जात होता.

Rakhi Sawant Husband | ‘आमचं आधीच लग्न झालंय, मग तो राखीचा नवरा कसा?’, रितेशची पहिली पत्नी स्निग्धा माध्यमांसमोर!
Rakhi-Ritesh
Follow us
| Updated on: Dec 20, 2021 | 12:06 PM

मुंबई : अलीकडेच, राखी सावंतचा (Rakhi Sawant) पती रितेश (Ritesh) ‘बिग बॉस 15’च्या (Bigg Boss 15) घरात आल्यानंतर त्याचा एक फोटो समोर आला होता, ज्यामध्ये तो एक महिला आणि मुलासोबत दिसत होता. ती रितेशची पहिली पत्नी असून, त्यांचा अद्याप घटस्फोट झाला नसल्याचा दावा केला जात होता. स्निग्धा प्रिया (Snigdha Priya) असे तिचे नाव आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिने रितेशची पत्नी असल्याचा दावा केला आहे.

रितेश विवाहित असून, तो स्वत:ला राखी सावंतचा नवरा कसा सांगत आहे याचे, मला स्वतःलाच आश्चर्य वाटत असल्याचे ती म्हणाली. स्निग्धाने असेही सांगितले की, तिने रितेशवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

लग्नानाला पूर्ण झाली 7 वर्ष!

‘बिग बॉस’मध्ये रितेशने स्वतःला बेल्जियमचा अनिवासी भारतीय असल्याचे सांगितले आहे. गेल्या सीझनमध्येही राखी सावंत त्याचे नाव घेत होती. या रिपोर्टनुसार, स्निग्धाने सांगितले की, ‘बिग बॉसमध्ये रितेश ज्याला तुम्ही पाहत आहात, तो माझा नवरा रितेश कुमार आहे. आम्ही दोघेही बिहारमधील बेतिया येथील आहोत. 1 डिसेंबर 2014 रोजी आमचे लग्न ठरले होते. त्यानंतर आम्ही मार्च 2015 मध्ये लग्न केले. त्यानंतर आम्ही चेन्नईला गेलो, आम्हाला एक मूलही आहे.’ स्निग्धाने सांगितले की, लग्नाच्या सात वर्षांत ती फक्त अडीच वर्षे रितेशसोबत होती, पण हा काळ तिच्यासाठी खूप कठीण होता.

त्याने मला मारहाण केली!

स्निग्धाने रितेशवर आरोप केला की, ‘तो मला अनेकदा मारहाण करायचा, पण 18 फेब्रुवारी 2017 रोजी परिस्थिती आणखी बिघडली. त्याने मला 4 तास बेल्टने मारहाण केली, त्यानंतर त्याची आई आणि बहीण आम्हाला भेटायला आल्या आणि मला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यानंतर मी माझ्या आईवडिलांच्या घरी परत गेले. तिने सांगितले की, तिच्या वडिलांनी स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये रितेशविरोधात तक्रारही दाखल केली होती. रितेश शेवटच्या वेळी, जून 2019 मध्ये नवाडा येथील त्याच्या घरी तो आला होता. यादरम्यान तो तिच्यासोबत 10 दिवस राहिला, पण नंतर निघून गेला आणि तिचा नंबरही ब्लॉक केला. स्निग्धाने सांगितले की, ‘रितेशने तीन महिन्यांपूर्वी माझ्याशी संपर्क साधला होता आणि घटस्फोट मागितला होता.’

रितेश स्वतः एनआरआय असल्याचा दावा करतोय, मात्र तो दावा खोटा असल्याचे स्निग्धाला वाटते. तिने सांगितले की, ‘जेव्हा मी बिग बॉसमध्ये रितेशला राखी सावंतच्या पतीच्या भूमिकेत पाहिले तेव्हा मलाही धक्का बसला. तो राखीसारख्या सेलिब्रिटीशी कसा लग्न करू शकतो यावर माझा विश्वासच बसत नाही. तो अजूनही विवाहित आहे आणि हे कायद्याच्या विरोधात आहे’.

हेही वाचा :

Aishwarya Rai Bachchan | ‘बच्चन’ परिवार अडचणीत, ऐश्वर्या रायला ‘ईडी’चे समन्स! नेमकं प्रकरण काय?

Kajal Aggarwal | ‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवालकडे ‘गुड न्यूज’? नव्या फोटोंमुळे चर्चेला उधाण!

Bajrangi Bhaijaan 2 : ‘मुन्नी-बजरंगी’ची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार, ‘बाहुबली’ दिग्दर्शकाचे वडील लिहिणार कथा!

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.