आदिल दुर्रानी याच्यासोबतच्या लग्नाची संपूर्ण स्टोरी राखी सावंत हिने अखेर सांगितली, लग्न, निकाह, इस्लाम आणि…
या सर्व चर्चा सुरू असतानाच आदिल दुर्रानी याने सर्वांना मोठा धक्का देत म्हटले की, हे लग्न मी नाकारू शकत नाही आणि स्वीकारू देखील शकत नाही. मला फक्त दहा दिवसांचा वेळ द्या.
मुंबई : राखी सावंत आणि आदिल दुर्रानी यांच्या लग्नावरून अनेक चर्चा सुरू आहेत. राखी हिने सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडीओ (Video) शेअर करत आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न झाल्याचे जाहिर केले. विशेष म्हणजे राखी सावंत (Rakhi Sawant) आणि आदिल दुर्रानी यांचे लग्न (Marriage) होऊन तब्बल सात महिने झाले आहेत. अशी एक चर्चा आहे की, लग्नानंतर राखी सावंत हिने मुस्लीम धर्म स्वीकारला आहे आणि आता राखीचे नाव फातिमा असे आहे. या सर्व चर्चा सुरू असतानाच आदिल दुर्रानी याने सर्वांना मोठा धक्का देत म्हटले की, हे लग्न मी नाकारू शकत नाही आणि स्वीकारू देखील शकत नाही. मला फक्त दहा दिवसांचा वेळ द्या, मी सर्व सांगेल की हे लग्न कोणत्या परिस्थितीमध्ये मला करावे लागले आहे.
आदिल दुर्रानी याने हे लग्न नाकारू शकत नाही आणि स्वीकारू देखील शकत नाही असे सांगत अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. दहा दिवसांनंतर आदिल दुर्रानी नेमका कोणता खुलासा करणार यावर देखील चर्चा सुरू आहेत.
नुकताच राखी सावंत हिने उमर उजालाला एक मुलाखत दिलीये आणि अनेक प्रश्नांची थेट उत्तरे दिली आहेत. राखी सावंत म्हणाली की, माझे आणि आदिलचे लग्न सात महिन्यांपूर्वीच झाले आहे. परंतू आदिल याने मला सांगितले होते की, एक वर्षापर्यंत आपल्या लग्नाबाबत कोणालाच सांगायचे नाही.
मी बिग बाॅसच्या घरात जाऊपर्यंत सर्वकाही ठिक होते. परंतू मी बिग बाॅसच्या घरातून बाहेर आल्यावर मला अनेक गोष्टीमध्ये बदल झालेला दिसला. यामुळे मला आमचे लग्न झाल्याचे मीडियाला सांगावे लागले. मी लग्न झाल्याचे सांगितल्यामुळे आदिल माझ्यावर नाराज आहे.
पुढे राखी म्हणाली, माझ्या आणि आदिलच्या प्रेमामध्ये कधीच धर्म येऊ शकत नाही. होय हे खरे आहे की, मी लग्नानंतर माझे नाव चेंज केले असून माझे नाव फातिमा आदिल खान दुर्रानी आणि राखी आदिल खान दुर्रानी असे आहे.
मी आदिलवर खूप जास्त प्रेम करते. यामुळे काहीही झाले तरीही मी त्याच्याविरोधात पोलिस तक्रार वगैरे करणार नाहीये. आम्ही गेल्या आठ महिन्यांपासून नवरा- बायकोप्रमाणे राहात आहोत. राखी म्हणाली, मला फॅमिली प्लानिंग करायचे आहे.