Rakhi Sawant | राखी सावंत हिला बसला मोठा धक्का, इडलीची किंमत ऐकून ड्रामा क्वीन हैराण
राखी सावंत हे कायमच चर्चेत राहणारे एक नाव आहे. विषय कोणताही असो राखी सावंत ही चर्चेत येते. गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत ही तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यावर काही गंभीर आरोप केले. हा वाद थेट कोर्टापर्यंत गेला.
मुंबई : राखी सावंत ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. बिग बाॅस मराठीमधून बाहेर पडल्यानंतर राखी सावंत (Rakhi Sawant) हिने लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर (Social media) शेअर करत सर्वांना मोठा धक्का दिला. विशेष म्हणजे हे फोटो शेअर करण्याच्या तब्बल सात महिने अगोदरच तिने आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न गाठ बांधली. राखी सावंत हिने आदिल दुर्रानी (Adil Durrani) याच्यासोबत लग्न केल्यानंतर इस्लाम धर्म स्वीकारला आहे. इतकेच नाही तर कोर्टात लग्न करून तिने आदिल दुर्रानी याच्यासोबत निकाह केलाय. लग्नानंतर राखी सावंत हिने तिने नाव फातिमा असल्याचे जाहिर केले.
राखी सावंत हिचे लग्न झाल्यानंतर काही दिवस सर्व व्यवस्थित होते. मात्र, अचानक राखी सावंत म्हणाली की, आदिल दुर्रानी हा मला धोका देत आहे. त्यानंतर अनेक वाद झाले आणि हे सर्व प्रकरण थेट पोलिस ठाण्यात केले. राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. आदिल दुर्रानी हा सध्या कोठडीमध्ये आहे. सतत आदिल दुर्रानी याच्यावर गंभीर आरोप करताना राखी सावंत दिसत आहे.
रजमान महिन्यात राखी सावंत रोजा ठेवताना दिसत आहे. इतकेच नाही तर तिने इफ्तार पार्टीचे आयोजन देखील केले. नुकताच राखी सावंत हिचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. राखी सावंत हिचा हा व्हिडीओ विमानतळावरील दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी राखी सावंत हिच्यावर टिका करण्यासही सुरूवात केलीये.
View this post on Instagram
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये राखी सावंत सहरी करताना देखील दिसत आहे. सहरी करण्यासाठी राखी सावंत ही विमानतळावरील एका शॉपवर इडली वडा आणि सांबरची आॅडर देताना राखी सावंत दिसत आहे. ज्यावेळी दुकानदार हा इडलीचे बिल तिला सांगतो, त्यावेळी राखी सावंत भडकते आणि म्हणते की, एक इडली आणि वडा 600 रूपयांना? मला उल्लू समजले का म्हणताना राखी दिसत आहे.
मग तो दुकानदार तिला समजून सांगतो, त्यानंतर राखी त्याचे बिल देऊन टाकते आणि म्हणते किती महाग आहे. 600 रूपयांमध्ये इडली आणि वडा?…त्यानंतर विमानतळावर राखी सावंत सहरी करताना दिसली. आता राखी सावंत हिचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओवर कमेंट करून अनेकांनी तिला खडेबोल सुनावले आहेत.
एका युजर्सने लिहिले की, हिने सर्व गोष्टींचा मजाक लावला आहे. दुसऱ्याने लिहिले की, हिने इस्लाम स्वीकारूनच मोठी चुक केलीये. तिसऱ्याने लिहिले की, या बाईने इस्लाम स्वीकारून मजाक लावला आहे मुर्ख, अजून एकाने लिहिले की, एकदम बकवास आहे, इस्लाम स्वीकारून हे सर्व अजिबात चालणार नाहीये. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त करत राखी सावंत विरोधात कमेंट केल्या आहेत.