राखी सावंत हिचा हिजाबमधील व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चांना उधाण, पाहा व्हिडीओमध्ये नेमके काय?
इतके दिवस लग्नाची गोष्ट लपवून ठेवण्याचे कारणही राखी सावंत हिने सांगून टाकले. लग्नानंतर राखी सावंत हिने इस्लाम कबुल केला आणि आता राखीचे नाव फातिमा असे आहे.
मुंबई : राखी सावंत हिने आदिल दुर्रानी यांच्यासोबत सात महिन्यांपूर्वी लग्न केल्याचे सांगत सर्वांनाच मोठा धक्का दिला. राखी आणि आदिल यांनी अगोदर कोर्टामध्ये लग्न केले आणि नंतर निकाह केला असे राखी सावंत (Rakhi Sawant) हिने सांगितले आहे. विशेष म्हणजे राखी सावंत हिने लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केले. इतके दिवस लग्नाची गोष्ट लपवून ठेवण्याचे कारणही राखी सावंत हिने सांगून टाकले. लग्नानंतर राखी सावंत हिने इस्लाम कबुल केला आणि आता राखीचे नाव फातिमा असे आहे. आदिल दुर्रानी याने राखी सावंत हिच्यासोबत झालेले लग्न स्वीकारू शकत नाही आणि नाकारू देखील शकत नाही, असे म्हणत सर्वांनाच मोठा धक्का दिला. मला दहा दिवसांचा वेळ द्या, मी राखी हिच्यासोबत कोणत्या परिस्थितीमध्ये लग्न केले हे सांगेल असे आदिल दुर्रानी म्हणाला.
राखी सावंत आणि आदिल दुर्रानी यांच्या लग्नानंतर अनेक चर्चांना उधाण आले. राखी सावंत हिने लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनी राखीचे अभिनंदन करण्यास सुरूवात केली. परंतू आदिल याने आता चक्क लग्नास नकार दिला आहे.
नुकताच राखी सावंत हिने इंस्टाग्रामवर एक खास व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये राखी सावंत हिने हिजाब घातल्याचे दिसत आहे. पुढे या व्हिडीओमध्ये राखी सावंत ही आदिल दुर्रानी याच्यासोबत मस्ती करताना दिसत आहे. भगव्या रंगाचा हिजाब राखीने घातलाय.
View this post on Instagram
राखी सावंत हिला मुंबईमध्ये पैपराजी स्पाॅट केले होते. यावेळी त्यांनी तिला लग्नाविषयी प्रश्न विचारताच राखी सावंत ही ढसाढसा रडायला लागली. यावेळी तिला लव्ह जिहादबद्दल विचारण्यात आले, राखी अगोदर म्हणाली, मी यावर बोलू इच्छित नाहीये…
पुढे राखी म्हणाली, जर आदिल दुर्रानी माझ्याकडे आला तर हे लव्ह जिहाद नाहीये…परंतू तो आलाच नाहीतर मग हे लव्ह जिहादच आहे. राखी म्हणाली, मी आता इस्लाम धर्म स्वीकारला आहे.
माझी आई सध्या दवाखान्यामध्ये आहे. अजून तिला हे काहीच माहिती नाहीये. मामा आणि मावशी म्हणत आहे की, हे सर्व तिला सांगायचे नाही. मी देखील सध्या माझ्या आईला हे काही सांगणार नाही. कारण यामुळे तिला धक्का बसू शकतो.