Bigg Boss 16 | सलमान खान नाही तर ‘हा’ व्यक्ती करणार शो होस्ट

आता प्रेक्षक विकेंडच्या वारची आतुरतेने वाट पाहात आहेत. कारण सलमान खान विकेंडच्या वारमध्ये घरातील सदस्यांचा चांगलाच क्लास घेतो.

Bigg Boss 16 | सलमान खान नाही तर 'हा' व्यक्ती करणार शो होस्ट
Salman khan
Follow us
| Updated on: Oct 21, 2022 | 8:08 AM

मुंबई : बिग बॉस 16 (Bigg Boss 16) चांगलेच रंगात आले असून घरामध्ये जोरदार भांडणे आणि आरोप- प्रत्यारोपचे सत्र सुरू आहे. बिग बॉसच्या घरातील हंगाम्यामुळे प्रेक्षकांचे जबरदस्त असे मनोरंजन होत आहे. अर्चना, गोरी, शालिन आणि गाैतम यांच्या भांडणामुळे तर प्रेक्षकांना मनोरंजनाचा (Entertainment) तडका भेटला. आता प्रेक्षक विकेंड का वारची आतुरतेने वाट पाहात आहेत. कारण सलमान खान विकेंडच्या वारमध्ये घरातील सदस्यांचा चांगलाच क्लास घेतो. मात्र, येणाऱ्या विंकेडच्या वारमध्ये सलमान खान (Salman Khan) दिसणार नसल्याची एक चर्चा आहे. सलमान खानऐवजी एक चित्रपट निर्माता शोला या विकेंडच्या वारला होस्ट करणार आहे.

बिग बॉस 16 च्या निर्मात्यांनी विकेंडचा वार खास बनवण्यासाठी चित्रपट निर्माता करण जोहरला आमंत्रित केल्याचे कळते. म्हणजेच काय तर विकेंडच्या वारमध्ये सलमान खान होस्ट करताना दिसणार नाहीये. मात्र, सलमानच्या चाहत्यांना घाबरून जाण्याची अजिबात गरज नाहीये. करण फक्त याच विकेंड वारला होस्ट करणार आहे. सलमान खान त्याच्या बिझी शेड्यूलमुळे यावेळीचा विकेंड वार होस्ट करू शकणार नसल्याची माहिती मिळत आहे.

विकेंड वारमध्ये करण जोहर बिग बॉसच्या घरातील सदस्यांचा क्लास घेणार आहे. यादरम्यान घरातील सदस्यांसोबत करण मस्ती करताना देखील दिसणार आहे. करण जोहर हा एक चांगला होस्ट आहे. कॉफी विथ करण शोला करण जोहरच होस्ट करतो. करणचा कॉफी विथ करण हा शो अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील सापडतो. आता बिग बॉस 16 मध्ये करण काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.