Bigg Boss 16 | सलमान खान याने काढली अर्चना गाैतम हिची खरडपट्टी
शिव ठाकरे, निम्रत, एमसी आणि सुंबुल हे सर्वजण टीना दत्ताचा दिल काळा असल्याचे म्हणत तिच्या दिलमध्ये काळे पाणी टाकतात.
मुंबई : आज बिग बाॅसच्या घरात विकेंडचा वार झाला. नेहमीप्रमाणेच सलमान खान हा विकेंडच्या वारला घरातील सदस्यांचा क्लास घेताना दिसला. यावेळी सलमान खानच्या निशाण्यावर प्रियंका चाैधरी, शालिन भनोट, टीना दत्ता आणि अर्चना गाैतम होते. सलमान खान घरातील सदस्यांना एक टास्ट देतो आणि टीना, प्रियंका यांच्यापैकी कोणाचा दिल काळा आहे, हे घरातील सदस्यांना एक एक करून विचारतो. ज्याचा दिल काळा आहे त्यामध्ये काळे पाणी टाकायला सांगतो.
शिव ठाकरे, निम्रत, एमसी आणि सुंबुल हे सर्वजण टीना दत्ताचा दिल काळा असल्याचे म्हणत तिच्या दिलमध्ये काळे पाणी टाकतात. घरामध्ये ज्याकाही गोष्टी दोन दिवसांमध्ये घडल्या आहेत, ते पाहून टीनावर कोणाचाच विश्वास राहिला नाहीये.
View this post on Instagram
टीना नेहमीच निम्रतला आपली चांगली मैत्रिण असल्याचे म्हणते. मात्र, निम्रतच्या पाठीमागे टीना काय बोलली आहे. हे निम्रतला समजल्यापासून निम्रतचा पारा चढला आहे. शिव ठाकरे यालाही वाटते की, टीनाचा दिल काळा आहे. दिलमध्ये काळे पाणी टाकल्यानंतर प्रत्येकाला कारण द्यायचे आहे.
गेल्या काही दिवसांपासून बिग बाॅसच्या घरामध्ये अर्चना गाैतम वादग्रस्त स्पर्धेक ठरत आहे. या विकेंडच्या वारला सलमान खान हा अर्चनाचा देखील क्लास घेतो. तू खूप जास्त हवेमध्ये असल्याचे सलमान अर्चनाला म्हणताना दिसतोय.
View this post on Instagram
एका टास्टमध्ये अर्चना सुंबुल ताैकीर हिच्या तोंडाबद्दल बोलते आणि म्हणते की, घराची राणी होण्यासाठी चेहराही चांगला लागतो राणीसारखा….तू तुझे तोंड बघितले आहे का? आणि निघाली राणी बनायला. याच गोष्टीमुळे सलमान खान हा अर्चना गाैतमला सुनावतो.