‘जज अनेक पण हातवारे एक…’, सारेगमपचे ‘पंचरत्न’ परीक्षक सोशल मीडियावर ट्रोल

‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत होते. या नव्या पर्वाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. मागील पर्वातील पंचरत्न म्हणजेच रोहित राऊत, आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड आणि प्रथमेश लघाटे हे ज्युरीच्या भूमिकेतून या पर्वात देखील प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत.

‘जज अनेक पण हातवारे एक...’, सारेगमपचे ‘पंचरत्न’ परीक्षक सोशल मीडियावर ट्रोल
सारेगमप पंचरत्न
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 11:04 AM

मुंबई : ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत होते. या नव्या पर्वाची चर्चा सर्वत्र सुरु आहे. मागील पर्वातील पंचरत्न म्हणजेच रोहित राऊत, आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड आणि प्रथमेश लघाटे हे ज्युरीच्या भूमिकेतून या पर्वात देखील प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमातील 14 लिटिल चॅम्प्स या स्पर्धेत प्रेक्षकांची मन जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत (SaReGaMaPa Lil Champs judges gets trolled on social media).

या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी या स्पर्धेत एलिमिनेशन होणार नाहीय. छोट्या दोस्तांना आपलं टॅलेंट संपूर्ण महाराष्ट्रासमोर सादर करण्याची संधी देणारा हा मंच अजून एक सरप्राईज प्रेक्षकांना देणार आहे. यात फक्त गाणारेच लिटिल चॅम्प्स नाही, तर वादक मित्रांमध्ये देखील काही छोटे दोस्त प्रेक्षकांच्या भेटीस येतील. यात सामील सगळेच स्पर्धक एकाहून एक सरस गाणी सादर करत आहेत. मात्र, दादा-ताई अर्थात ज्युरी बनून खुर्चीवर विराजमान ‘पंचरत्न’ त्यांच्या स्टाईलमुळे ट्रोल होत आहेत.

पाहा मीम्स :

काय म्हणतायत नेटकरी?

सोशल मीडियावर अक्षरशः मीम्सचा पाऊस पडत आहे. नेटकऱ्यांच्या मते, स्पर्धेत सगभागी झालेले स्पर्धक उत्तम सादरीकरण करत आहेत. मात्र, ज्युरीच्या हावभावांनी वैतागलेले प्रेक्षक त्यांची इतर शोच्या जजेसशी तुलना करत आहेत. या बाबतचे अनेक मीम्स व्हायरल होत आहेत.

छोटे वादक होणार सहभागी!

सारेगमप लिटिल चॅम्प्सच्या या नवीन पर्वात 4 छोटे वादक मित्र संगीताची साथ देताना दिसतील. यात नाशिकचा 11 वर्षांच्या जय अविनाश गांगुर्डेचा समावेश आहे, जो कोंगो तुंबा वाजवताना दिसेल. जय वयाच्या दोन वर्षापासून हे वाद्य वाजवतोय. तसंच, त्याला ‘अटल गौरव अलंकार’ हा मध्य प्रदेश सरकार पुरस्कार देखील मिळाला आहे. कोल्हापूरची तन्वी धनंजय पाटील ही वयाच्या 8 वर्षांपासून वारणा बालवाद्य वृंदमध्ये सक्रीय आहे. तिला मेंडोलिन, जलतरंग हार्मोनियम,कीबोर्ड आणि व्हायोलिन एवढी सगळी वाद्य वाजवता येतात. त्याच बरोबर ती खूप छान गाते सुद्धा. ती लिटिल चॅम्प्सच्या गाण्यांमध्ये मेंडोलिन वाजवून साथ देणार आहे.

तसंच कोल्हापूरचाच सोहम सचिन जगताप हा प्रेक्षकांना संतूर वाजवताना दिसेल. सोहम वयाच्या बाराव्या वर्षांपासून संतूर, तर तिसऱ्या वर्षांपासून बासरी शिकत आहे. औरंगाबादचा सोहम उगले हा प्रेक्षकांना कार्यक्रमात संबळ वाजवताना दिसेल, तो वयाच्या चौथ्या वर्षांपासून संबळ शिकतोय. आपण क्वचित पाहिलेली वाद्य देखील ही मुलं अगदी सहज वाजवतात.

(SaReGaMaPa Lil Champs judges gets trolled on social media)

हेही वाचा :

Bigg Boss Marathi 3 Promo | ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाची उत्सुकता संपली, मांजरेकरांनी शेअर केला प्रोमो

सुनेच्या सेटवर मिथुन चक्रवर्तींची सरप्राईज व्हिजीट, ‘अनुपमा’सोबत जुन्या आठवणींना उजाळा!  

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.