Aai Kuthe Kay Karte | अरुंधतीच्या घरात अनिरुद्धच्या भावाची एंट्री, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार अविनाश देशमुख!

सध्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये (Aai Kuthe Kay karte) नवनवीन वळणं येत आहेत. मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. अशातच आता मालिकेत एका नव्या पाहुण्याची एंट्री होणार आहे.

Aai Kuthe Kay Karte | अरुंधतीच्या घरात अनिरुद्धच्या भावाची एंट्री, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार अविनाश देशमुख!
आई कुठे काय करते
Follow us
| Updated on: Jul 16, 2021 | 4:31 PM

मुंबई : सध्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये (Aai Kuthe Kay karte) नवनवीन वळणं येत आहेत. मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. अशातच आता मालिकेत एका नव्या पाहुण्याची एंट्री होणार आहे. हा नवा पाहुणा म्हणजेच अरुंधतीचा दीर, अनिरुद्धचा भाऊ ‘अविनाश देशमुख’ असणार आहे. मालिकेत अविनाश देशमुखची भूमिका अभिनेता शंतनू मोघे (Shantanu Moghe) साकारणार आहे.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील ‘छत्रपती शिवाजी महाराजां’ची भूमिका साकारणारे अभिनेते शंतनू मोघे ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत एंट्री घेणार आहेत. अविनाशच्या येण्याने देशमुखांच्या ‘समृद्धी’ बंगल्यात नव्या घडामोडी घडणार आहेत, तर या दरम्यान धमाल देखील पाहायला मिळणार आहे.

पाहा मालिकेचा नवा प्रोमो :

‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये अविनाशची एंट्री दाखवली गेली आहे. या प्रोमोत अविनाश आणि अनिरुद्ध एकमेकांसोबत पंजा लढवत धमाल करताना दिसत आहेत. यावेळी पंजा लढवण्याच्या स्पर्धेत अविनाशने अनिरुद्धकडे खास बक्षीस महीतले आहे. मी जिंकलो तर मला मी म्गेन ते देशील का? असे अविनाशने अनिरुद्धला विचारले. या खेळत अविनाश जिंकल्यानंतर तो अनिरुद्धला म्हणतो, दादा प्लीज या घरच्या लक्ष्मीला थांबव.’ अर्थात अरुंधतीला घरी थांबवण्याचा प्रयत्न कर, अशी मागणी अविनाशने अनिरुद्धकडे केली आहे.

अविनाशच्या येण्याने बदलेल अरुंधती-अनिरुद्धचे नाते?

देशमुखांच्या घरात एकीकडे यश आणि गौरीच्या साखरपुड्याची तयारी सुरु आहे, तर दुसरीकडे अरुंधती आणि अनिरुद्धच्या घटस्फोटाची लगबग सुरु आहे. नुकतीच दोघांना घटस्फोटाची तारीख मिळाली आहे. या दिवसानंतर अरुंधती आणि अनिरुद्धचे रस्ते कायमचे वेगळे होणार आहेत. देशमुखांच्या घरात यशाच्या साखरपुड्यासाठी सगळ्या नातेवाईकांची हजेरी असणार आहे. याच साठी आता देविका आणि अविनाश ‘समृद्धी’ बंगल्यात आले आहेत.

अविनाशची मागणी ऐकून तरी अरुंधती आणि अनिरुद्ध आपापले निर्णय बदलतील अशी आशा सर्वाना वाटत आहे. अर्थात अरुंधतीने आधीच मनाशी ठाम गाठ बांधल्याने हे जवळपास अशक्य वाटत आहे. त्यमुळे अविनाशच्या येण्याने देशमुखांचे प्रश्न सुट्टीला का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अंकिताचं बिंग फुटलं!

अभिषेकशी लग्न करण्यासाठी अंकिता आणि तिच्या आईने रचलेला सगळा डाव आता देशमुख कुटुंबाच्या समोर आला आहे. यानंतर आता देशमुख कुटुंबातून अंकिताची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे या घरात पुन्हा एकदा अनघाची एंट्री होऊल, असा अंदाज चाहते वर्तवत आहेत.

(Shantanu Moghe As Avinash new entry in Star Pravah Serial Aai Kuthe Kay karte)

हेही वाचा :

Surekha Sikri Death | ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे कार्डियक अ‍ॅरेस्टमुळे निधन, दीर्घकाळापासून होत्या आजारी

रणरागिणीची यशोगाथा उलगडणाऱ्या ‘स्वराज्यजननी जिजामाता’चा 500 भागांचा सुवर्ण टप्पा!

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.