Me Honar Superstar Chhote Ustaad: शुद्धी कदम ठरली ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ची महाविजेती
विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना शुद्धी कदम (Shuddhi Kadam) भावूक झाली होती. हा दिवस स्वप्नवत असल्याची भावना तिने व्यक्त केली. महाअंतिम सोहळ्यात सामील होण्यासाठी शुद्धीने बरीच मेहनत घेतली होती. महाअंतिम सोहळ्यातलं उत्तम सादरीकरण तिला विजेतेपद देऊन गेलं.
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद’ (Me Honar Superstar Chhote Ustaad) कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. राजयोग धुरी, शुद्धी कदम, सार्थक शिंदे, सिद्धांत मोदी, राधिका पवार आणि सायली टाक या सहा स्पर्धकांमध्ये अंतिम लढत रंगली. अटीतटीच्या या लढतीत ठाण्याच्या शुद्धी कदमने (Shuddhi Kadam) बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली. तर उपविजेते ठरले सार्थक शिंदे आणि राजयोग धुरी. सायली ठाक ठरली तृतीय क्रमांकाची मानकरी, तर सिद्धांत मोदी आणि राधिका पवारला उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल गौरवण्यात आलं. विजेती शुद्धी कदमला चार लाखांची रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह (winning prize) देण्यात आलं.
विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना शुद्धी कदम भावूक झाली होती. हा दिवस स्वप्नवत असल्याची भावना तिने व्यक्त केली. महाअंतिम सोहळ्यात सामील होण्यासाठी शुद्धीने बरीच मेहनत घेतली होती. महाअंतिम सोहळ्यातलं उत्तम सादरीकरण तिला विजेतेपद देऊन गेलं. इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळाल्यामुळे शुद्धी कदम आणि तिचे कुटुंबिय आनंदात आहेत. शुद्धीने शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं आहे. मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या मंचावर तिला गाण्याचे वेगवेगळे प्रकार सादर करता आले. या मंचाने सचिन पिळगावकर, वैशाली सामंत, आदर्श शिंदे, अविनाश-विश्वजीत गुरुच्या रुपात दिले. या गुरुंकडून खूप काही शिकायला मिळाल्याची भावना शुद्धीने व्यक्त केली.
इन्स्टा पोस्ट-
View this post on Instagram
शुद्धी कदम या पर्वाची विजेती असली तरी महाअंतिम फेरीतील सर्वच स्पर्धकांनी या पर्वात आपली चमकदार कामगिरी दाखवली आहे. अप्रतिम गाणी सादर करुन प्रेक्षकांची मन जिंकलेल्या मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा 8 मे रोजी पार पडला. या महाअंतिम सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध संगीतकार अविनाश-विश्वजीत, निलेश मोहरीर, रोहन रोहन, पंकज पडघन, कौशल इनामदार उपस्थित होते. यासोबतच स्टार प्रवाहच्या परिवाराच्या उपस्थितीत सोहळ्याची रंगत द्विगुणीत झाली.