Sidharth Shukla | सिद्धार्थ शुक्ला याच्या आईचा व्हिडीओ तूफान व्हायरल, पाहा काय खास आहे त्यामध्ये

सिद्धार्थ शुक्ला याचे चाहते आता शहनाज गिल हिला सपोर्ट करताना दिसतात. इतकेच नाही तर आता सलमान खान याच्या आगामी चित्रपटामध्ये शहनाज गिल ही महत्वाच्या भूमिकेत आहे.

Sidharth Shukla | सिद्धार्थ शुक्ला याच्या आईचा व्हिडीओ तूफान व्हायरल, पाहा काय खास आहे त्यामध्ये
Follow us
| Updated on: Feb 18, 2023 | 8:56 PM

मुंबई : बिग बाॅस 13 चा विजेता सिद्धार्थ शुक्ला याचे निधन 2 सप्टेंबर 2021 रोजी झाले. सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. बिग बाॅस 13 मधून सिद्धार्थ शुक्ला याने आपल्या चाहत्यांचे जबरदस्त मनोरंजन केले होते. शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडली. सिद्धार्थ शुक्ला याची फॅन फाॅलोइंग देखील जबरदस्त होती. सिद्धार्थ शुक्ला याचे निधन अटॅक आल्याने झाले. निधनाच्या वेळी शेवटी सिद्धार्थ शुक्ला याच्यासोबत शहनाज गिल (Shehnaaz Gill) ही होती. त्याच्या राहत्या घरीच त्याचे निधन झाले. सिद्धार्थ शुक्ला याच्या निधनानंतर शहनाज गिल पूर्णपणे तुटलेली दिसली. शहनाज गिल हिचे हे हाल पाहून चाहत्यांना धक्का बसला होता. सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांची लव्ह स्टोरी बिग बाॅस १३ च्या घरातून सुरू झाली. बिग बाॅस 13 मध्ये कधीही न पाहिलेले रूप सिद्धार्थ शुक्ला याचे चाहत्यांना बघायला मिळाले.

सिद्धार्थ शुक्ला याचे चाहते आता शहनाज गिल हिला सपोर्ट करताना दिसतात. इतकेच नाही तर आता सलमान खान याच्या आगामी चित्रपटामध्ये शहनाज गिल ही महत्वाच्या भूमिकेत आहे. किसी का भाई किसी की जान या चित्रपटामध्ये शहनाज गिल ही सलमान खान याच्यासोबत स्क्रीन शेअर करेल.

सध्या सिद्धार्थ शुक्ला याच्या आईचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ शुक्ला याची आई बोलताना दिसत आहे. इतकेच नाही तर यावेळी सिद्धार्थ शुक्ला याच्या आईने चाहत्यांचे धन्यवाद देखील मानले आहेत.

सिद्धार्थ शुक्ला याची आई रिटा यांना एक महिला विचारते की, तुम्हाला काही बोलायचे आहे का? यावर सिद्धार्थ शुक्लाची आई म्हणते की, मला सांगायचे आहे की, माझेही तुमच्या सर्वांवर खूप प्रेम आहे. मला तुमचे सर्वांचे मेसेज कायम येतात आणि मला खूप आनंद वाटतो की इतके लोक माझ्यावर प्रेम करतात आणि याचे कारण फक्त सिद्धार्थ शुक्ला आहे.

आता सिद्धार्थ शुक्ला याच्या आईचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. सिद्धार्थ शुक्ला याच्या आईच्या व्हिडीओवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. सिद्धार्थ शुक्ला याच्या निधनानंतर त्याची आई रिटा चर्चेत आली. सतत चाहते यांचे फोटो आणि व्हिडीओ लाईफ करताना दिसतात.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.