‘इंडियन आयडल मराठी’कडून भारतरत्न लता मंगेशकर यांना स्वरांजली, लतादिदींच्या अजरामर गीतांचा नजराणा

सोनी मराठी वाहिनीवरील 'इंडियन आयडल मराठी'या कार्यक्रमातून भारतरत्न लता मंगेशकर यांना स्वरांजली वाहण्यात येणार आहे. येत्या १४ फेब्रुवारीला हा भाग प्रसारित होणार आहे.

'इंडियन आयडल मराठी'कडून भारतरत्न लता मंगेशकर यांना स्वरांजली, लतादिदींच्या अजरामर गीतांचा नजराणा
इंडियन आयडल मराठी
Follow us
| Updated on: Feb 12, 2022 | 6:02 PM

मुंबई : सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनीवरील ‘इंडियन आयडल मराठी’ (Indian Idol Marathi) या कार्यक्रमातून भारतरत्न लता मंगेशकर (Bharatratn Lata Mangeshkar) यांना स्वरांजली वाहण्यात येणार आहे. येत्या १४ फेब्रुवारीला हा भाग प्रसारित होणार आहे. संगीतसृष्टीला पडलेलं सुरेल स्वप्न म्हणजे लता मंगेशकर. लतादिदींनी आपल्या वडिलांकडून गाण्याचं प्रशिक्षण घेऊन अगदी कमी वयात गाण्याची सुरुवात केली. गेली अनेक दशकं लता मंगेशकर या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. नायिकांच्या तब्बल चार पिढ्यांना लता दिदींनी आवाज दिला आहे. त्यांचा इहलोकीचा प्रवास जरी संपला असला, तरी त्या त्यांच्या गाण्याच्या रूपाने येणारी अनेक दशकं जिवंत असणार आहेत. त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी इंडियन आयडल मराठी कार्यक्रमात त्यांची गाणी गावून त्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.

लता मंगेशकरांना स्वरांजली

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं 6 फेब्रुवारीला निधन झालं. त्यांच्या जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. पण लता मंगेशकर त्यांच्या गाण्यांच्या रूपाने कायम आपल्यात असणार आहेत. त्यांच्या कार्याला सलाम करण्यात येणार आहे. इंडियन आयडल मराठी कार्यक्रमात त्यांची गाणी गावून त्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.

संगीतसृष्टीला पडलेलं सुरेल स्वप्न म्हणजे लता मंगेशकर. लतादिदींनी आपल्या वडिलांकडून गाण्याचं प्रशिक्षण घेऊन अगदी कमी वयात गाण्याची सुरुवात केली. गेली अनेक दशकं लता मंगेशकर या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. नायिकांच्या तब्बल चार पिढ्यांना लता दिदींनी आवाज दिला आहे. त्यांचा इहलोकीचा प्रवास जरी संपला असला, तरी त्या त्यांच्या गाण्याच्या रूपाने येणारी अनेक दशकं जिवंत असणार आहेत.

‘इंडियन आयडल मराठी’च्या मंचावर स्पर्धक आणि परीक्षक अजय-अतुल यांच्याकडून भारतरत्न लता मंगेशकर यांना स्वरांजली वाहिली जाणार आहे. या वेळी गीतकार-कवी गुरू ठाकूर आणि सौमित्र हेसुद्धा उपस्थित असणार आहेत. हा खास भाग प्रेक्षकांना १४ फेब्रुवारीला पाहायला मिळणार आहे. हा २ तासांचा विशेष भाग असणार आहे.

संबंधित बातम्या

अभिनय बेर्डे आणि प्रथमेश परब एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार, ‘सिंगल’मधून हास्याचा धमाका करणार

Mitali Mayekar: हवा में उडता जायें… पांढरा शुभ्र लेहेंगा अन् निखळ हास्य; मिताली मयेकरचा बोल्ड अँड ब्युटिफूल अंदाज पाहिला का?

IPL 2022 Auction Day 1 Live Updates: मेगा ऑक्शनमध्ये दिसला शाहरूखचा मुलगा, चाहता म्हणाला, ‘शेर का बच्चा आ गया’

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.