Bigg Boss 16 | सुंबुल ताैकीर हिच्या वडिलांनी घेतले एक पाऊल मागे
यादरम्यान त्यांनी टीना दत्ता आणि शालिन भनोट यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली.
मुंबई : बिग बाॅसच्या घरात मोठे धमाके होताना दिसत आहेत. मात्र, बिग बाॅसच्या घराबाहेर देखील सुंबुल ताैकीर खान हिच्या वडिलांचे एक वेगळेच बिग बाॅस सुरू आहे. अगोदर आरोग्याचे कारण देत मुलीशी चर्चा केली. त्यावरून मोठे राजकारण रंगले होते. यादरम्यान त्यांनी टीना दत्ता आणि शालिन भनोट यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. त्यानंतर सुंबुल ताैकीरचे वडील, शालिन भनोटचे आई-वडील आणि टीना दत्ताची आई बिग बाॅसच्या मंचावर आले.
काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत सुंबुल ताैकीरच्या वडिलांनी चाहत्यांना एक आवाहन केले होते आणि म्हटले होते की, सुंबुलला वोट अजिबात करून नका. तिला बिग बाॅसच्या घराबाहेर येऊ द्या.
सुंबुल ताैकीरच्या वडिलांचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. अनेकांनी सुंबुलच्या वडिलांवर टीका देखील केली होती. त्यानंतर आता नवा व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना त्यांनी नवीन विनंती केली आहे.
Nimrit ne kiya contestants ko rank, kya woh reh paayegi apne decision mein frank? ?
Dekhiye #BiggBoss16 Mon-Fri raat 10 baje aur Sat-Sun raat 9 baje, sirf #Colors par. Anytime on @justvoot#BB16 #BiggBoss@beingsalmankhan pic.twitter.com/gY4EPQIRuQ
— Bigg Boss (@BiggBoss) November 30, 2022
नव्या व्हिडीओमध्ये सुंबुल ताैकीरच्या वडिलांनी चाहत्यांना सुंबुलला वोट करण्याची विनंती केली असून सुंबुलला साथ द्या असे आवाहन देखील केले. काही दिवसांपूर्वी सुंबुलचा गेम चुकीचा जात होता.
बिग बाॅसच्या घरात सुंबुल ही शालिनच्या मागे पुढे करताना दिसत होती. विशेष म्हणजे एमसी आणि शालिनच्या भांडणानंतर बिग बाॅसच्या घराबाहेर अनेक चर्चां रंगल्या होत्या.
आता सुंबुलने वडिलांचे ऐकले असून ती शालिन भनोट आणि टीना दत्ता यांच्यासोबत राहत नाहीये. आता ती शिव ठाकरे आणि साजिद खान यांच्यासोबत राहत आहे. मात्र, अजूनही सुंबुलचा गेम काही सुधारलेला अजिबात दिसत नाहीये.
टीना दत्ता आणि शालिन भनोटवर सुंबुल ताैकीरच्या वडिलांनी ज्याप्रकारे टीका केली होती. त्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता. त्यानंतर सुंबुलच्या वडिलांनी माफी देखील मागितली होती.