वरमाला टाकताना अभिनेत्री थांबली, अचानक काय घडलं?; कुटुंबालाही फुटला घाम
श्रेनूला थांबलेलं पाहून वऱ्हाडींमध्ये चुळबुळ होते. काही लोक गळ्यात वरमाला का टाकत नाहीस? असा सवाल करतात. त्यावर श्रेनूने दिलेलं उत्तर मजेदार आहे. नवरदेवाच्या गळ्यात वरमाला टाकू की नको याचा मी विचार करतेय. अजूनही मी थांबलेय, असं श्रेनूने म्हणताच एकच हास्यकल्लोळ होतो. त्यानंतर ती अक्षयच्या गळ्यात वरमाला टाकते.
सुरत | 26 डिसेंबर 2023 : ‘इश्कबाज’ फेम अभिनेत्री श्रेनू पारिखने अभिनेता अक्षय म्हात्रेसोबत विवाह केलाय. श्रेनू आणि अक्षयचा विवाह गुजरातमध्ये पार पडला. या दोघांच्या लग्नाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दोघेही स्टेजवर उभे आहेत. श्रेनू ही अक्षयच्या गळ्यात वरमाला टाकायला जाताना दिसते. पण अक्षयच्या गळ्यात वरमाला टाकण्यापूर्वी काही क्षण ती जागेवरच थांबते. श्रेनू अचानक थांबलेली पाहून काही काळ तिच्या घरचेही टेन्शनमध्ये आलेले दिसतात. वऱ्हाडींनाही घाम फुटताना दिसतोय. श्रेनू थांबल्यानंतर आजूबाजूच्या लोकांचा आवाजही स्पष्ट ऐकायला येतोय…
श्रेनू आणि अक्षयचा वडोदरामध्ये ग्रँड विवाह सोहळा पार पडला. या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या लग्न सोहळ्याला सेलिब्रिटिंची मांदियाळी होती. श्रेनूने तिच्या मेहंदी आणि हळदीच्या कार्यक्रमाचे फोटोही सोशल मीडियावर टाकले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही रोमांटिक अंदाजमध्ये दिसत आहेत.
व्हिडीओमध्ये काय?
श्रेनूला थांबलेलं पाहून वऱ्हाडींमध्ये चुळबुळ होते. काही लोक गळ्यात वरमाला का टाकत नाहीस? असा सवाल करतात. त्यावर श्रेनूने दिलेलं उत्तर मजेदार आहे. नवरदेवाच्या गळ्यात वरमाला टाकू की नको याचा मी विचार करतेय. अजूनही मी थांबलेय, असं श्रेनूने म्हणताच एकच हास्यकल्लोळ होतो. त्यानंतर ती अक्षयच्या गळ्यात वरमाला टाकते. तिने वरमाला टाकताच हा क्षण टिपण्यासाठी फोटोग्राफरची धडपड सुरू झालेली पाहायला मिळते.
खरंतर फोटोग्राफरनेच तिला पोज देण्यासाठी थांबवलं होतं. त्यामुळे श्रेनू थांबली होती. फोटोग्राफरला पाहिजे तशी पोजिशन मिळाल्यानंतर तिने अक्षयच्या गळ्यात हार घातला. तोपर्यंत तिने मस्करीत हार टाकू की नको असा विचार करतेय, असं म्हणत सर्वांनाच घाम फोडला होता. श्रेनूने अक्षयच्या गळ्यात हार टाकल्यावर आलेल्या वऱ्हाडींनी सुटकेचा नि:श्वास टाकला. श्रेणूच्या या व्हिडीओवर यूजर्सनी मजेदार कमेंट्स केल्या आहेत. हे रिअल लग्न वाटतंय. भारतीय लग्न सोहळ्यात फन्यूजन होतच असतं, असं एकाने म्हटलंय.
श्रेनू आणि अक्षय दोघेही पहिल्यांदा 2021मध्ये भेटले. टीव्ही मालिका ‘घर एक मंदिर’च्या सेटवर दोघे भेटले होते. त्यानंतर मार्चपासून त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. त्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.