अखेर तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेमधील हे महत्वाचे पात्र ही अभिनेत्री रिप्लेस करणार

टप्पू, मेहता साहब आणि अंजली भाभी यांच्या जागी इतर कलाकार रिप्लेस करण्यात आले. परंतू निर्मात्यांना अजूनही दयाबेनच्या पुनरागमनाची प्रतिक्षा कायम आहे.

अखेर तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेमधील हे महत्वाचे पात्र ही अभिनेत्री रिप्लेस करणार
Follow us
| Updated on: Jan 13, 2023 | 3:28 PM

मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या काही वर्षांपासून सतत चाहत्यांचे मनोरंजन (Entertainment) करत आहे. घरातील प्रत्येक सदस्याची आवडती मालिका म्हणजे तारक मेहताच आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मालिकेमधील महत्वाचे कलाकार मालिकेला रामराम ठोकत आहेत. याचा परिणाम थेट TRP वर होताना दिसत आहे. मेहता साहब, टप्पू, दयाबेन आणि अंजली भाभी यांनी मालिका (Series) सोडल्याने प्रेक्षकांना मोठा धक्का बसला. टप्पू, मेहता साहब आणि अंजली भाभी यांच्या जागी इतर कलाकार रिप्लेस करण्यात आले. परंतू निर्मात्यांना अजूनही दयाबेनच्या पुनरागमनाची प्रतिक्षा कायम आहे. मात्र, दयाबेन अर्थात दिशा वकानी कधी मालिकेमध्ये पदार्पण करणार हे स्पष्ट होऊ शकले नाहीये.

मालिकेमधील दुसरे एक महत्वाचे पात्र म्हणजे बाघाची बावरी ही देखील गेल्या काही दिवसांपासून गायब आहे. मालिकेमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, बावरी सध्या तिच्या गावाकडे गेलीये. मात्र, जुन्या बावरीने देखील मालिकेला सोडचिठ्ठी दिलीये.

आता तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेचे निर्माता असित मोदी यांनी अत्यंत महत्वाची माहिती शेअर केलीये. आता मालिकेमध्ये लवकरच नवी बावरी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tarak mehta

नवीना वाडेकर ही बावरीच्या भूमिकेत येणार आहे. मोनिका भदोरिया हिने अनेक वर्ष तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेमध्ये बावरीचे पात्र साकारले. आता बावरीच्या भूमिकेमध्ये नवीना वाडेकर दिसणार आहे.

विशेष म्हणजे नव्या बावरीचे बाघासोबतचे काही फोटोही व्हायरल करण्यात आले आहेत. नवीना वाडेकर हिचा लूक देखील जुन्या बावरीसारखाच दिसत आहे. अनेक कलाकारांनी मागील काही वर्षांमध्ये मालिकेला सोडचिठ्ठी दिली आहे.

सतत कलाकार मालिका सोडून जात असल्याने मालिकेच्या TRP वर मोठा परिणाम झालाय. नेहमी TRP मध्ये तारक मेहता ही मालिका पुढे असायची. मालिकेचे निर्माते अजून काही मोठे बदल करण्याची देखील दाट शक्यता आहे.

श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.