The Kapil Sharma Show | प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘कप्पू की टोली’ पुन्हा तयार! ‘कपिल शर्मा’ शोमध्ये नव्या चेहऱ्याची एंट्री!

कपिलच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. कपिल शर्मा पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना गुदगुल्या करण्यासाठी सज्ज झाला आहे.

The Kapil Sharma Show | प्रेक्षकांना हसवण्यासाठी ‘कप्पू की टोली’ पुन्हा तयार! ‘कपिल शर्मा’ शोमध्ये नव्या चेहऱ्याची एंट्री!
कपिल शर्मा शो
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 6:31 PM

मुंबई : कॉमेडी किंगच्या नावाने प्रसिद्ध कपिल शर्माच्या चाहत्यांची यादी खूप लांबलचक आहे. कपिलच्या चाहत्यांना त्यांची कॉमिक स्टाईल खूप आवडते. अशा परिस्थितीत आता कपिलच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. कपिल शर्मा पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना गुदगुल्या करण्यासाठी सज्ज झाला आहे. पुन्हा एकदा लोकप्रिय कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) चाहत्यांसमोर सादर करण्यात येणार आहे.

आता कपिल शर्माने आपल्या टीमसह कार्यक्रमाचे शूटिंग सुरू केले आहे. नुकतेच कपिल शर्माने त्याच्या शूटिंग लोकेशनवरील एक फोटो शेअर केला आहे. पण, आता चाहत्यांसाठी ‘द कपिल शर्मा शो’ चा प्रोमोही रिलीज करण्यात आला आहे. खास गोष्ट म्हणजे यावेळी सुनील ग्रोव्हर आणि सुमोना चक्रवर्ती या शोमधून गायब राहणार आहेत.

कृष्णाने शेअर केला व्हिडीओ :

सोमवारी अभिनेता कृष्णा अभिषेकने एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो आणि त्याची संपूर्ण टीम नव्या हटके अवतारात परतण्यासाठी तयार असल्याचे दिसत आहे. कृष्णा अभिषेकने शेअर केलेल्या स्वत: कृष्णा अभिषेकपासून अर्चना पूरन सिंगपर्यंत प्रत्येकजण या प्रोमोमध्ये दिसतो.

कृष्णाने व्हिडीओ शेअर केला आणि लिहिले की, ही टोळी पूर्ण धमाका घेऊन परत येत आहे. काल आमच्या प्रोमो शूटचा पहिला दिवस होता. सर्वांसाठी हा किती मजेदार दिवस होता, आता आपली प्रतीक्षा लवकरच संपणार आहेत. ही टीम आपल्याला पुन्हा हसवणार आहे.

सुनीलच्या जागी सुदेश

अभिनेता सुनील ग्रोव्हर (Sunil Grover) पुन्हा या शोमध्ये दिसणार आहे की नाही, याची चाहत्यांना बरीच प्रतीक्षा होती. पण आता हे शक्य होणार नाहीय. कारण रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये सुनील नाही तर, कपिल आणि कृष्णाचा जुना मित्र सुदेश लहरी दाखल झाला आहे.

यावेळी कॉमेडियन सुदेश लहरी (Sudesh Lahari) ‘द कपिल शर्मा शो’च्या टीममध्ये दाखल झाला आहे. कपिल आणि सुदेशने यापूर्वी एकत्र काम केले होते. पण यासह असे दिसते की, यावेळी कपिलच्या शोमधून सुमोना चक्रवर्ती हिचा पत्ता कापला गेला आहे. कारण, आतापर्यंत समोर आलेल्या कोणत्याही फोटो आणि व्हिडीओंमध्ये सुमोना दिसली नाही.

पुन्हा एकदा या कार्यक्रमात कपिल (Kapil Sharma) आणि कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) सोडून चंदन प्रभाकर (Chandan Prabhakar), अर्चना पूरन सिंह (Archana Puran Singh) आणि भारती सिंह (Bharti Singh) एक मजबूत आणि वेगळ्या अवतारात परत येणार आहेत. त्याचबरोबर हा शो बॉलिवूड स्टार सलमान खान (Salman Khan) निर्मित करणार आहे.

(The Kapil Sharma Show back on screen promo released)

हेही वाचा :

Expensive Gift to Priyanka : निक जोनसकडून प्रियांका चोप्रासाठी महागड गिफ्ट, सोशल मीडियावर फोटो शेअर

डॉक्टरांचा कोट, चेहऱ्यावर खट्याळ हसू, ‘डॉक्टर जी’मधील आयुष्मान खुरानाचा ‘फर्स्ट लुक’ रिलीज!

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.