The Kapil Sharma Show | चाहत्यांसाठी मोठा धक्का, कपिल शर्माचा शो बंद होणार?

'द कपिल शर्मा' (The Kapil Sharma) शोच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) त्याच्या काॅमेडीने सर्वांना हसवत असतो.

The Kapil Sharma Show | चाहत्यांसाठी मोठा धक्का, कपिल शर्माचा शो बंद होणार?
Follow us
| Updated on: Jan 24, 2021 | 2:32 PM

मुंबई : ‘द कपिल शर्मा’ (The Kapil Sharma) शोच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) त्याच्या काॅमेडीने सर्वांना हसवत असतो. मात्र, आता कपिल शर्माच्या शो संदर्भात मोठी बातमी येत आहे. ही बातमी ऐकल्यानंतर कपिल शर्माच्या चाहत्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. द कपिल शर्मा शो लवकरच ऑफ एअर होणार आहे, म्हणजचे हा शो बंद होणार आहे. कपिलच्या चाहत्यांसाठी ही बातमी खरोखर धक्कादायक आहे. (The Kapil Sharma show will be closed)

कपिलच्या शोमध्ये सलमान खान ते अक्षय कुमार यांच्यापर्यंत अनेक दिग्गज कलाकार आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले आहेत. अशा परिस्थितीत शो बंद होणार म्हटल्यावर चाहते निराश झाले आहेत.  मात्र, चाहत्यांना निराश होण्याची काही गरज नाही. ही बातमी खरी आहे की, शोचे प्रसारण होणार नाही परंतु केवळ काही दिवसांसाठी. होय, काही दिवसांनी कपिल पुन्हा नव्या लूकसह शोमध्ये परत येईल. अशा परिस्थितीत चाहत्यांना निराश होण्याची गरज नाही कारण कपिल शर्मा लवकरच लोकांचे मनोरंजन करताना दिसेल.

द कपिल शर्मा शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेता कपिल शर्मा आता लवकरच एका वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या वेब सीरिजसाठी त्याने एक-दोन नव्हे तर 20 कोटी रुपये घेतल्याचा दावा अभिनेता कृष्णा अभिषेकने केला आहे. ‘द कपिल शर्मा’ शोच्या एका भागात कृष्णाने हा गौप्यस्फोट केला होता. मात्र, नंतर ही केवळ गंमत असल्याचं नंतर सांगण्यात होते.

कॉमेडियन कपिल शर्मा टीव्ही इंडस्ट्रीचे एक प्रसिद्ध नाव आहे. त्याने केवळ टेलिव्हिजनवर आपली क्षमता सिद्ध केली नाही, तर बॉलिवूड सेलिब्रिटींमध्येही तो खूप लोकप्रिय आहे. कपिल लवकरच वेब सीरिजच्या माध्यमातून डिजिटलमध्ये पदार्पण करणार आहे, याची चर्चा सर्वत्र आहे. कपिल त्याच्या डिजिटल पदार्पणासाठी 20 कोटी रुपये घेत असल्याचे अलिकडेच कृष्णा अभिषेकने सांगितलं. मात्र तो एक विनोद असल्याचे नंतर सांगण्यात आले.

परंतु कपिल शर्मा डिजिटलमध्ये पदार्पणासाठी एवढी मोठी रक्कम घेणार आहे. हे ऐकल्यावर अनेकांना धक्काच बसला. कपिल शर्माच्या अनेक चाहत्यांनी याबद्दल कपिलला विचारण्याचा प्रयत्नही केला, मात्र कपिलकडून कोणतेही उत्तर मिळू शकले नाही. कपिल शर्मा त्याच्या डिजिटल पदार्पणासाठी खरोखरच २० कोटी घेणार आहे का? याचे कुतूहल मात्र त्याच्या चाहत्यांना अजूनही आहे.

संबंधित बातम्या :

डोळ्यावर गॉगल, ट्रॅडिशनल आऊटफिट; वरुण धवनच्या मेहंदीचे फोटो पाहिलेत का?

सलमान खान-जान्हवी कपूर यांच्या चित्रपटाला शेतकरी आंदोलनाचा फटका, आंदोलकांची आक्रमक भूमिका

(The Kapil Sharma show will be closed)

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.