रिअल लाईफमध्ये अत्यंत खास आहे मिसेस सोढीची लव्ह स्टोरी, अगोदर प्रेम आणि…
प्रेक्षक मालिकेमध्ये दिशा वकानी हिला मिस करत आहेत. दयाबेनच्या गरब्याचे अनेक लोक फॅन आहेत. या मालिकेमधील प्रत्येक पात्र खास आहे.
मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन करत आहे. या मालिकेमध्ये मुंबईच्या गोरेगाव परिसरातील एक सोसायटी दाखवण्यात आलीये. या सोसायटीमध्ये सर्व लोक हे एखाद्या परिवारासारखे राहताना दाखवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या सोसायटीमध्ये विविध राज्यातील लोक राहतात. टप्पू सेना सोसायटीमध्ये धमाल करताना कायमच दिसते. प्रत्येक सण सोसायटीमध्ये साजरा केला जातो. जेठालाल आणि मेहता साहब हे मालिकेमधील मुख्य पात्र आहेत. गेल्या काही दिवसांपासून मालिकेमधून दयाबेन अर्थात दिशा वकानी (Disha Vakani)ही गायब आहे. प्रेक्षक मालिकेमध्ये दिशा वकानी हिला मिस करत आहेत. दयाबेनच्या गरब्याचे अनेक लोक फॅन आहेत. या मालिकेमधील प्रत्येक पात्र खास आहे. मालिकेमधील सर्वात रोमॅंटिक जोडी रोशन अॅंन्ड रोशनची आहे. या जोडीला देखील प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळते.
मालिकेमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, मिसेस रोशन सोढी आणि मिस्टर सोढी यांचा प्रेम विवाह झाला आहे. दोघेही वेगवेगळ्या धर्माचे आहेत. विशेष बाब म्हणजे रिअल लाईफमध्येही मिसेस सोढी यांनी आंतरजातीय विवाह सोहळा केलाय.
मिसेस सोढी अर्थाच रिअल लाईफमधील जेनिफर बन्सीवाल यांची लव्ह स्टोरी एखाद्या मोठ्या चित्रपटातील स्टोरीप्रमाणेच आहे. पारशी कुटुंबात जन्मलेल्या जेनिफरने आपल्या प्रेमासमोर कोणाचाही विचार न करता प्रसिद्ध अभिनेते मयूर बन्सीवाल याच्यासोबत लग्न केले.
View this post on Instagram
जेनिफर बन्सीवाल आणि मयूर बन्सीवाल यांची जोडी हीट आहे. दोघेही अनेक व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर कायमच शेअर करतात. विशेष म्हणजे यांचा चाहता वर्गही मोठा आहे.
जेनिफर बन्सीवाल तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेसोबत अगोदरपासून जोडलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेला अनेकांनी सोडचिठ्ठी दिलीये.
अनेक कलाकार हे मालिका सोडून जात असताना देखील मालिका टीआरपीमध्ये टाॅपलाच बघायला मिळते. शैलेश लोढ़ा यांनीही मालिका सोडली आहे. तारक मेहताचे पात्र शैलेश लोढ़ा हे मालिकेमध्ये साकारत होते.