तुनिशा शर्मा हिचा शेवटचा व्हिडीओ व्हायरल, शीजान खान अभिनेत्रीला घेऊन…
तुनिशाच्या आत्महत्येनंतर लव्ह जिहादचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला.
मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिने 24 डिसेंबरला आत्महत्या केलीये. आज मुंबईमध्ये तुनिशा हिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी तुनिशा हिच्या आईच्या डोळ्यातील अश्रू थांबवत नव्हते. तुनिशा हिच्या चाहत्यांसोबत सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी तुनिशा अशाप्रकारे जगाचा निरोप घेईल, असा विचारही कोणी केला नसेल. तुनिशा हिच्या आत्महत्येनंतर धक्कादायक खुलासे सातत्याने केले जात आहेत. तुनिशाच्या आत्महत्येनंतर लव्ह जिहादचा मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला.
तुनिशाच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने बॉयफ्रेंड शीजान खान याच्यावर गंभीर आरोप केले. शीजान आणि तुनिशा हे दोघे दास्तान-ए-काबुल या मालिकेत मुख्य भूमिकेत होते. मालिकेच्या सेटवर तिने गळफास घेतला.
तुनिशा आणि शीजान यांचे पंधरा दिवसांपूर्वीच ब्रेकअप झाले होते आणि यामुळेच तुनिशा ही तणावामध्ये असल्याचे सांगितले जात आहे. प्रेमामध्ये तिला धोका देण्यात आल्याचे तिच्या एका नातेवाईकाने सांगितले होते.
नुकताच तुनिशा हिचा एक शेवटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये तिला दवाखान्यात घेऊन जाताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शीजान खान देखील दिसतोय.
तुनिशा शर्मा हिच्या आईने शीजान खान याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तोच शीजान खान हा तुनिशा हिला घेऊन पळत दवाखान्यात जाताना दिसतोय. तुनिशाच्या आईने केलेल्या आरोपांनंतर शीजान याला पोलिसांनी अटक केलीये.
पोलिसांनी शीजानला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला 4 दिवसांची कोठडी सुनावण्यात आलीये. तुनिशा हिच्या अंत्यसंस्काराला शीजानची आई आणि बहीण देखील उपस्थित होत्या.