‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत ‘हा’ लोकप्रिय अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर येत्या 2 मे पासून सुरु होणाऱ्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tujhech Me Geet Gaat Aahe) मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. चिमुकल्या स्वराच्या निरागस जगाविषयी जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता आहे.

'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत 'हा' लोकप्रिय अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत
उर्मिला कोठारे- तुझेच मी गीत गात आहेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 9:15 AM

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवर येत्या 2 मे पासून सुरु होणाऱ्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tujhech Me Geet Gaat Aahe) मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. चिमुकल्या स्वराच्या निरागस जगाविषयी जाणून घेण्याची प्रत्येकालाच उत्सुकता आहे. गाण्याची आवड असणारी स्वरा ज्या गायकाच्या प्रेमात आहे त्या सुप्रसिद्ध गायक मल्हारची भूमिका अभिनेता अभिजीत खांडकेकर (Abhijeet Khandkekar) साकारणार आहे. या मालिकेत अभिनेत्री उर्मिला कोठारेसुद्धा मुख्य भूमिका साकारतेय. या मालिकेच्या निमित्ताने ती तब्बल 12 वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन करतेय. उर्मिला आणि अभिजीत अशी नवी जोडी या मालिकेत प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे बालकलाकार अवनी तायवाडेचीही यात भूमिका आहे. नागपूरच्या अवनीने मालिकेच्या प्रोमोंमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतल्या या भूमिकेविषयी सांगताना अभिजीत म्हणाला, ‘आपल्या प्रत्येकाच्याच मनात एक सुप्त इच्छा असते की, आपण मोठं झाल्यावर गायक व्हावं. या मालिकेच्या निमित्ताने गायक बनण्याची माझी ही इच्छा पूर्ण होत आहे. मी गायक नाही मात्र उत्तम कानसेन आहे. याआधी आरजे आणि सूत्रसंचालनाचा अनुभव असल्यामुळे संगीतक्षेत्राशी निगडीत सर्वच मान्यवरांसोबत भेटीचा योग आला आहे. त्यामुळे मालिकेत गायकाची भूमिका साकारणं अवघड नाही मात्र आव्हानात्मक नक्कीच आहे. कुठलंही नवं काम नेहमीच नवी स्फुर्ती घेऊन येत असतं. त्यामुळे सध्या उत्सुकता आणि हुरहुर अश्या दोन्ही भावना आहेत. जुन्या भूमिकेची नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर छाप असते. त्यामुळे नवी भूमिका प्रेक्षकांच्या मनात उतरवणं हे आव्हानात्मक असतं. स्टार प्रवाहच्या सर्वच मालिका प्रेक्षक प्रेमाने पहात आहेत आणि टीआरपीच्या रुपात भरभरुन प्रेम देत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीसोबत जोडला जाण्याचा आनंद शब्दात व्यक्त करता येत नाहीय. याआधी मी साकारलेल्या भूमिकांवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. या नव्या कलाकृतीला देखील तेवढंच प्रेम मिळेल ही आशा आहे.’

मालिकेतील अभिजीतचा लूक-

पहा मालिकेचा नवा प्रोमो-

2 मे पासून रात्री 9 वाजता ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही नवी मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा:

फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, शेर शिवराजनंतर पुढे काय? अखेर मिळालं उत्तर

Sher Shivraj Review: ‘शेर शिवराज’ची दुमदुमणारी गर्जना; बरंच काही शिकवून जातो प्रतापगडाचा रणसंग्राम

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.