‘तारक मेहता’मध्ये काम करण्यापेक्षा…; ‘या’ अभिनेत्रीने का केलं टोकाचं विधान?

'तारक मेहता का उल्ट चश्मा' या मालिकेमागचं शुक्लकाष्ठ काही संपता संपत नाहीये. रोशन भाभीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्रीने मालिकेचा निर्माता असित मोदी यांच्यावर गंभीर आरोप केला. त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीने आरोप केला आहे.

‘तारक मेहता’मध्ये काम करण्यापेक्षा...; 'या' अभिनेत्रीने का केलं टोकाचं विधान?
TMKOC rowImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 21, 2023 | 7:41 AM

मुंबई : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा‘ ही टीव्हीवरील सीरिअल गेल्या काही दिवसांपासून वादात अडकली आहे. या सीरिअलमधील करामतीवरून ही सीरिअल वादात अडकलेली नाही तर सीरिअलबाहेरच्या करामतीमुळे ही सीरिअल अधिकच अडचणीत आली आहे. या सीरिअलमध्ये रोशन भाभीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री या अभिनेत्रीने मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केला आहे. त्यामुळे एकच वादळ निर्माण झालं होतं. पण हे आरोप शांत होत नाही तोच आता आणखी एका अभिनेत्रीने गंभीर आरोप केले आहेत. ही अभिनेत्री केवळ गंभीर आरोप करून थांबलेली नाही तर तिने यापेक्षा मेलेलं बरं असा उद्विग्न विधानही केलं आहे.

हे सुद्धा वाचा

मोनिका भदौरिया असं या अभिनेत्रीचं नाव आहे. मोनिकाने तारक मेहतामध्ये बावरीची व्यक्तिरेखा साकारली होती. या मालिकेत ती बागाची प्रेमिका दाखवलेली आहे. विसराळू आणि अल्लड मुलीची व्यक्तिरेखा तिने अप्रतिमपणे साकारली होती. जेनिफरप्रमाणेच मोनिकानेही असित मोदींवर आरोप केले आहेत. असित मोदी आपला पेमेंट रोखून ठेवतात. मानसिक छळ करतात, असा आरोप मोनिकाने केला आहे.

प्रचंड टॉर्चर

मोनिका एवढ्यावरच थांबली नाही तर तिने तारक मेहता मालिकेची तुलना आत्महत्येशी केली आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत तिने हे टोकाचं विधान केलं आहे. मला या शोमध्ये सर्वाधिक टॉर्चर करण्यात आलं. त्यामुळे या शोमध्ये काम करण्यापेक्षा आपण मेलेलं बरं असं नेहमी वाटायचं, असं तिने सांगितलं.

कार्यकारी निर्मात्याकडून दबाव

तिला मेंटली टॉर्चर केल्याचा दावाही तिने केला आहे. माझ्यावर निर्माते असित मोदी चिडायचे. माझ्याशी गैरवर्तन केल जायचं, असं तिने सांगितलं. तुला पैसे मिळतात ना, त्यामुळे जे सांगितलं जाईल ते कर असं मला सोहेल म्हणाला होता, असा दावा मोनिकाने केला आहे. सोहेल हा तारक मेहता का उल्टा चश्माचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर आहे.

अखेर मालिकाच सोडली

बावरीच्या व्यक्तीरेखेतून मोनिका भदौरिया प्रचंड लोकप्रिय झाली होती. 2013पासून ती या सीरिअलमध्ये काम करत आहे. अनेक वर्ष काम केल्यानंतर तिने अखेर ही मालिका सोडली. मोनिकाने हा शो सोडल्यानंतर तिच्या जागेवर नविना वाडेकरला रिप्लेस करण्यात आलं आहे. सध्या नविना बावरीचा रोल करत आहे. जानेवारीपासूनच नविना या शोमध्ये दाखल झाली आहे.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.