बोल्ड अवतारात बीचवर सर्फिंग करताना दिसली ‘भिडे मास्तरां’ची ‘सोनू’, अभिनेत्रीचा बिकिनी लूक तुफान चर्चेत!

व्हायरल झालेल्या या फोटो आणि व्हिडीओमध्ये निधी भानुशाली समुद्राच्या मध्यभागी सर्फिंग बोर्डवर आपला तोल सांभाळताना दिसत आहे. वेव्ह सर्फिंग करणं खूप अवघड काम आहे, पण निधी हे खूप चांगल्या प्रकारे करत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

बोल्ड अवतारात बीचवर सर्फिंग करताना दिसली ‘भिडे मास्तरां’ची ‘सोनू’, अभिनेत्रीचा बिकिनी लूक तुफान चर्चेत!
Nidhi Bhanushali
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 3:38 PM

मुंबई : टीव्ही जगातील लोकप्रिय कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मधील बालकलाकार आता तरुण झाले आहेत. मनोरंजन विश्वापासून दूर असले तरी लोकांची मने जिंकत आहेत. या लोकप्रिय मालिकेत ही मुले लहानाची मोठी होताना प्रेक्षकांनी देखील पाहिली आहेत. याच शोचा एक भाग असलेली अभिनेत्री निधी भानुशाली (Nidhi Bhanushali) म्हणजेच जुन्या ‘सोनू’ला सोशल मीडियावर लोकांचे खूप प्रेम मिळत आहे. सध्या निधी भानुशालीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे.

व्हायरल झालेल्या या फोटो आणि व्हिडीओमध्ये निधी भानुशाली समुद्राच्या मध्यभागी सर्फिंग बोर्डवर आपला तोल सांभाळताना दिसत आहे. वेव्ह सर्फिंग करणं खूप अवघड काम आहे, पण निधी हे खूप चांगल्या प्रकारे करत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. लूकबद्दल बोलायचे तर, निधी या फोटोमध्ये मोकळ्या केसांसह निळ्या आणि काळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे.

पाहा व्हिडीओ :

लोकांना आवडतायत निधीच्या अदा

‘भिडे मास्तरां’ची लाडकी लेक ‘सोनू’ साकारून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री निधी भानुशाली हिचे फोटो आणि व्हिडीओ अनेकदा व्हायरल होतात. अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती तिच्या आयुष्यातील या साहसी क्षणांची छायाचित्रेही चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता निधीचा हा फोटो आणि सोबतचा व्हिडीओ देखील खूप व्हायरल होत आहे. तिची शैली लोकांना खूप आवडते आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, निधीने हा फोटो आणि व्हिडीओ यावर्षी मार्चमध्ये शेअर केला होता. मात्र, तो आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

2019 मध्ये ‘TMKOC’ला केलाय ‘रामराम’

निधीने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतून तिने अफाट प्रसिद्धी मिळवली. यानंतर तिने 2019 मध्ये उच्च शिक्षणासाठी ही लोकप्रिय मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता मालिकेत ‘सोनू’ची भूमिका अभिनेत्री पलक सिधवानीने साकारत आहे. निधीपूर्वी ‘सोनू’ची भूमिका अभिनेत्री झील मेहता करत होती.

(TMKOC Sonu fame actress Nidhi Bhanushali surfing on beach in bikini video goes viral)

हेही वाचा :

Birth Anniversary | कधीकाळी बस कंडक्टर म्हणून करायचे काम, ‘सर्वोत्कृष्ट विनोदवीर’ बनण्यामागे जॉनी वॉकर यांचा मोठा संघर्ष!

Happy Birthday Mala Sinha | कधीकाळी चित्रपटसृष्टीवर राज्य करायच्या माला सिन्हा, आता मनोरंजन विश्वापासून राहतायत दूर!

Happy Birthday Boney Kapoor | कठीण काळात साथ देत बोनी कपूरने जिंकले श्रीदेवींचे मन, ‘अशी’ सुरु झाली होती लव्हस्टोरी…

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.