Video: ‘या अनुभवाला तोड नव्हती..’; वहिनीसाहेब धनश्रीच्या मुलाचा हा व्हिडीओ पाहिलात का?

'तुझ्यात जीव रंगला' (Tujhyat Jeev Rangala) या लोकप्रिय मालिकेत वहिनीसाहेबांची भूमिका साकारणारी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री धनश्री काडगावकर (Dhanashree Kadgaokar) सध्या आईसाहेबांच्या भूमिकेत आहे. गेल्या वर्षी धनश्रीने मुलाला जन्म दिला. सोशल मीडियाद्वारे ती चाहत्यांना ही गोड बातमी दिली होती.

Video: 'या अनुभवाला तोड नव्हती..'; वहिनीसाहेब धनश्रीच्या मुलाचा हा व्हिडीओ पाहिलात का?
Dhanashri KadgaonkarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 12:42 PM

‘तुझ्यात जीव रंगला’ (Tujhyat Jeev Rangala) या लोकप्रिय मालिकेत वहिनीसाहेबांची भूमिका साकारणारी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री धनश्री काडगावकर (Dhanashree Kadgaokar) सध्या आईसाहेबांच्या भूमिकेत आहे. गेल्या वर्षी धनश्रीने मुलाला जन्म दिला. सोशल मीडियाद्वारे ती चाहत्यांना ही गोड बातमी दिली होती. इन्स्टाग्रामवर (Instagram) सक्रिय असणार धनश्री तिच्या मुलासोबतचे फोटो आणि व्हिडीओ नेहमी शेअर करत असते. नुकताच तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये धनश्री तिच्या मुलासोबत स्ट्रॉबेरीचा आनंद घेताना दिसतेय. धनश्रीचा मुलगा कबीरने शेतातील स्ट्रॉबेरी तोडून त्याचा पहिल्यांदाच आस्वाद घेतला. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिने हा अनुभव कसा होता, याविषयी सांगितलं.

धनश्रीची पोस्ट-

‘कबीरसाठी हा सगळा पहिलाच अनुभव होता. त्याला नक्कीच मजा आली असावी. सुरुवातीला मला वाटलं, न धुतलेल्या स्ट्रॉबेरी कशा त्याला खायला द्याव्या? पण त्याला काही सांगेपर्यंत त्याने ती खायला सुरुवात केली होती. एरवी सगळं स्टेरिलाइज वगैरे करणारी मी तिथे काहीच नाही करू शकले. पण या अनुभवाला तोड नव्हती, त्याने स्वतः ती स्ट्रॉबेरी तोडून स्वतः पहिल्यांदा खाल्ली. मजा आली मला त्याला असं बघून. आपली माती आपली माणसं,’ अशा शब्दांत धनश्रीने तिचा अनुभव सांगितला.

‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मराठी मालिकेतून धनश्रीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर ‘गंध फुलांचा गेला सांगून’, ‘जन्मगाठ’ या मालिकेतूनही धनश्री प्रेक्षकांसमोर आली होती. मात्र, ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून धनश्री घराघरात पोहोचली. तिची ‘वहिनीसाहेब’ ही भूमिका चांगलीच गाजली. मालिका विश्वात सक्रिय असतानाच 2013मध्ये धनश्रीने दुर्वेशसोबत लग्नगाठ बांधली.

हेही वाचा:

“आमचं लग्न टिपिकल नव्हतं..”; रेणुका शहाणेंनी सांगितला आहेराचा किस्सा

‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर अक्षय कुमारसोबत विनोदविरांचा कल्ला!

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.