Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tunisha Sharma Suicide : ज्याच्यामुळे आत्महत्या करावी लागली तो शीजान खान कोण आहे?; अटकेनंतर तुनिशाच्या मृत्यूचं रहस्य उलगडणार?

अभिनयाव्यतिरिक्त शीजान फिटनेसवर अधिक लक्ष केंद्रीत करतो. सोशल मीडियावर त्याचे जीममधील वर्कआऊट करतानाचे फोटोही आहेत.

Tunisha Sharma Suicide : ज्याच्यामुळे आत्महत्या करावी लागली तो शीजान खान कोण आहे?; अटकेनंतर तुनिशाच्या मृत्यूचं रहस्य उलगडणार?
ज्याच्यामुळे आत्महत्या करावी लागली तो शीजान खान कोण आहे?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 25, 2022 | 7:13 AM

पालघर: वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिने आत्महत्या केली. अलीबाबा दास्तान ए काबूलच्या चित्रीकरणावेळी तुनिशाने मेकअप रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी तुनिशाची आई वनिताने अभिनेता शीजान खान याच्याविरोधात पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी शीजानला अटक केली असून आज त्याला वसईच्या कोर्टात हजर केलं जाणार आहे. शीजान हा तुनिशाचा सहकलाकार आहे. दोघांचे प्रेमसंबंध होते. दोघे रिलेशनमध्ये होते. मात्र, त्यांचा ब्रेकअप झाल्याने तुनिशा तणावाखाली होती. त्यातूनच तिने आत्महत्या केल्याचं सांगितलं जातं.

शीजान खान हा अभिनेत्री नाजचा भाऊ आहे. तो टीव्ही कलाकार असून मॉडलही आहे. शीजानचा जन्म 9 सप्टेंबर 1994ला मुंबईत झाला. तो महाराष्ट्रीय मुस्लिम कुटुंबाशी संबंधित आहे. शीजानने मुंबई विद्यापीठातून पदवी घेतलेली आहे.

हे सुद्धा वाचा

शीजानने त्याच्या अभिनयाची सुरुवात 2013मधून केली. ऐतिहासिक नाटक जोधा अकबरपासून त्याने करिअरची सुरुवात केली. 2016मध्ये त्याने सिलसिला प्यारमध्ये काम केलं होतं. त्यांतर 2017मध्ये त्याने चंद्र चांदनी या नाटकात काम केलं होतं. 2018मध्ये पृथ्वी वल्लभमध्ये त्याने प्रिन्स कार्तिकेयची भूमिका साकारली होती.

त्यानंतर तो अलीबाबा दास्तान ए काबूलमध्ये तुनिशा शर्मासोबत लीड रोलमध्ये दिसून आला होता. शीजानच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तुनिशासोबतचे त्याचे भरपूर फोटो आणि व्हिडिओ आहेत. त्यामुळे दोघांची चांगलीच केमिस्ट्री जमत असल्याचं दिसून येतं.

अभिनयाव्यतिरिक्त शीजान फिटनेसवर अधिक लक्ष केंद्रीत करतो. सोशल मीडियावर त्याचे जीममधील वर्कआऊट करतानाचे फोटोही आहेत.

दरम्यान, काल दुपारी मदर नेचर स्टुडिओत अलीबाबाचं चित्रीकरण सुरू होतं. त्यावेळी तुनिशा आपल्या सहकलाकारासोबत मेकअप रुममध्ये गेली. तुनिशा शोसाठी रेडी होत होती. मात्र, अचानक तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.